‘झापूक झुपूक’चं शूटिंग डन, सूरज चव्हाणची हिरोईन कोण? अखेर 'बच्चा'चा चेहरा समोर आलाच
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan zapuk zupuk shooting completed : 'झापूक झुपूक' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सूरज चव्हाणची हिरोईन कोण असणार माहितीये का? अखेर तो चेहरा समोर आला.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीत बहुप्रतिक्षित सिनेमा म्हणजे झापुक झुपूक. ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता सूरज चव्हाण याच्या आयुष्यावर आधारित ‘झापूक झुपूक’ या सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा सिनेमा सूरजच्या प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकणार असून, चाहत्यांमध्ये याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमात सूरजची प्रमुख हिरोईन कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष होतं अखेर सूरजच्या हिरोईनचा चेहरा देखील सर्वांसमोर आला आहे. केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सूरजची बच्चा पाहायला मिळतेय. टेलिव्हिजन गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री सूरज चव्हाणची हिरोईन असेल असा अंदाज या व्हिडीओवरून लावण्यात येत आहे.
सूरज चव्हाणचा प्रेरणादायी प्रवास
सूरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी 5’ मध्ये आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली. त्याच्या साध्या आणि प्रामाणिक स्वभावामुळे तो घराघरात पोहोचला. या रिअॅलिटी शोमध्ये त्याने 2024 मध्ये विजेतेपद पटकावलं आणि आता त्याच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येत असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. ‘झापूक झुपूक’ हा सिनेमा सूरजच्या संघर्षमय जीवनावर आणि त्याच्या यशस्वी प्रवासावर आधारित आहे. या सिनेमातून प्रेक्षकांना सूरजच्या आयुष्यातील अनेक अज्ञात पैलू पाहायला मिळणार आहेत.
advertisement
केदार शिंदेंचं दिग्दर्शन
केदार शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. ‘अगं बाई अरेच्चा', महाराष्ट्र शाहीर यांसारख्या सुपरहिट सिनेमांमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘झापूक झुपूक’ या सिनेमातून ते सूरज चव्हाणचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर आणत आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाचे काही खास क्षण दाखवले आहेत. यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
advertisement
सिनेमाचं शूटिंग संपताच सूरज चव्हाणने त्याच्या स्टाइलमध्ये देवीचा जयकार केलाय. आईमरी माता, ओम नम: शिवाय, गणपती बाप्पा मोरया अशा जयघोष सूरज चव्हाणने केला. व्हिडीओमध्ये सूरज चव्हाणचा सिनेमातील लुक देखील पाहायला मिळतोय. सूरज चव्हाणने पिंक कलरचं जॅकेट आणि व्हाइट कलरचं धोतर परिधान केलंय ज्यावर पिंक कलरचे क्यूट हार्ट प्रिंट केलेले आहेत. व्हिडीओच्या शेवटी एक अभिनेत्री गुलाबी रंगाच्या साडीत दिसतेय. ती अभिनेत्री जुई भागवत असल्याचं दिसतंय. आता सूरजची झापूक झुपूक मधील हिरोईन जुई भागवत आहे का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
advertisement
advertisement
झापूक झुपूकची रिलीज डेट
केदार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झापूक झुपूक’ या सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. चित्रीकरणासाठी 45 दिवसांचा कालावधी लागला असून, आता पोस्ट-प्रॉडक्शनचं काम सुरू होणार आहे. हा सिनेमा 25 एप्रिल 2025 रिलीज होणार आहे.
चाहत्यांची उत्सुकता
सूरज चव्हाणच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा एक खास भेट ठरणार आहे. सोशल मीडियावर या सिनेमाबद्दल चर्चा सुरू झाली असून, अनेकांनी केदार शिंदे यांच्या पोस्टवर कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे. "आई येडामाई कडे एकच साकडं आहे … झापूक झूपूक" , "एकदम हिट होऊदे & Top ला जाऊदे, नक्कीच सर खूप आतुरतेने वाट पाहतोय #zapuk zupuk च्या चित्रपटाची", अशा अनेक कमेंट्सचा पाऊस या व्हिडीओवर पाहायला मिळतोय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 06, 2025 1:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
‘झापूक झुपूक’चं शूटिंग डन, सूरज चव्हाणची हिरोईन कोण? अखेर 'बच्चा'चा चेहरा समोर आलाच