नव्या सिनेमात विनोदाची जुनी जादू! अशोक-वंदना यांच्या 'अशी ही जमवा-जमवीचा' फर्स्ट लुक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका असलेला "अशी ही जमवा जमवी" हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे.
मुंबई : चित्रपट आणि प्रेमकथा यांचे एक वेगळेचं नातं आहे. प्रेमाची अशीच एक नवी व्याख्या लवकरच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित, अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका असलेला "अशी ही जमवा जमवी" हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती आणि आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात नवीन आणि जुन्या कलाकारांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
अनेक वर्षांनी अशोक सराफ आणि वंदना गुप्ते एकत्र
या चित्रपटात अनेक वर्षांनी अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ही जोडी एकत्र दिसणार आहे. याशिवाय ओमकार कुलकर्णी आणि तनिष्का विशे ही नवी जोडी देखील या चित्रपटात झळकणार आहे. यात सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. लोकेश गुप्ते यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
advertisement
चित्रपती व्ही. शांताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव राहुल शांताराम यांनी राजकमल एंटरटेनमेंटची स्थापना केली आहे. मनोरंजन विश्वात काहीतरी नवे घेऊन येण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या कंपनीचा हा पहिला चित्रपट आहे.
advertisement

रिलीज डेट
"अशी ही जमवा जमवी" या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच चित्रपटाची कथा रंजक असल्याचे जाणवते. ही जमवा जमवी नेमकी कशी होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना एप्रिल पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 10 एप्रिल 2025 रोजी हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 06, 2025 1:07 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नव्या सिनेमात विनोदाची जुनी जादू! अशोक-वंदना यांच्या 'अशी ही जमवा-जमवीचा' फर्स्ट लुक