बालपण, मैत्री आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या; 'एप्रिल मे 99' चा टीझर रिलीज

Last Updated:

april may 99 teaser : बालपण, मैत्री आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवणींवर आधारित एक सुंदर चित्रपट या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

News18
News18
मुंबई : लवकरच शाळांना सुट्टी लागणार आहे आणि मुलांचा आवडता उन्हाळा सुरू होणार आहे. या सुट्ट्यांमध्ये तुमच्या मुलांना एक सुंदर चित्रपट दाखवू शकता त्याचबरोबर तुमच्या बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधल्या आठवणींना उजाळा देऊ शकता. उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण करून देणारा 'एप्रिल मे 99' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आपल्याला आपल्या बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणीत पुन्हा एकदा घेऊन जाणार आहे. या चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेते रितेश देशमुख याने सोशल मीडियावरून हा टीझर शेअर करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

निसर्गसौंदर्य आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा 

advertisement
मापुस्कर ब्रदर्स, फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे 99' या चित्रपटात मैत्री, बालपण आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणींची अनोखी गोष्ट पहायला मिळणार आहे. टीझरमध्ये कोकणातील निसर्गसौंदर्याची सुंदर झलक दाखवण्यात आली आहे. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेणारी मुले आणि त्यांची धम्माल पहायला मिळते. या चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
advertisement














View this post on Instagram
























A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)



advertisement
'एप्रिल मे 99' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे. राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी, मॉरिस नून हे चित्रपटाचे निर्माते असून लॉरेन्स डिसोझा हे सहनिर्माते आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणाले, “मी माझ्या पहिल्याच चित्रपटासाठी दिग्गजांचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल भाग्यवान समजतो. पोस्टरचे अनावरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले तर आता टीझर लाँच रितेश सरांच्या हस्ते झाला आहे. मी रितेश सरांसोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोन्ही वेळा ते चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यांच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळते. माझ्या पहिल्या चित्रपटाच्या टीझरचे लाँचिंग त्यांच्या हस्ते होणे ही आनंदाची गोष्ट आहे.” 16 मे 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
advertisement
निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “'एप्रिल मे 99' हा चित्रपट मैत्री, स्वप्न आणि तारुण्यावर आधारित आहे. सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. खूप हलक्याफुलक्या पद्धतीने साकारलेली ही कथा प्रेक्षकांना त्यांच्या आठवणीत नक्कीच घेऊन जाईल.”
मराठी बातम्या/मनोरंजन/
बालपण, मैत्री आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या; 'एप्रिल मे 99' चा टीझर रिलीज
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement