महिला दिनी मनोरंजनाचा महासंगम! तयार रहा, 14 मालिका सलग 7 तास पाहायला

Last Updated:

8 मार्च जागतिक महिला दिन. या दिवशी स्टार प्रवाह वाहिनी एक अनोखा प्रयोग करत आहे. सलग सात तास तुम्हाला तुमच्या आवडत्या मालिका पाहायला मिळणार आहेत.

News18
News18
मुंबई : कधी विचार केलाय का आपल्या मालिकांमध्ये बायकांच्या कहाण्या का दाखवल्या जातात? नवऱ्याची लफडी, बायकांच्याच आपसात भांडणं... अशा कथा का? कारण आजही आपल्या समाजात बाईला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हुंड्यासाठी जाळलं जाणं, मुलगा हवा म्हणून मुलींना मारलं जाणं, बाईवर हात उचलला जाणं, अन्याय सहन करावा लागणं... या सगळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या, लढणाऱ्या बायकांच्या कथा म्हणजे आपल्या मालिकांमधल्या जानकी, अबोली, मुक्ता, मंजिरी, कला आणि मानसी!
घरातून बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या, स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची कहाणी मालिकांमधून मांडली जाते. लेखिका आरती म्हसकर यांनी याच भावना त्यांच्या कवितेतून व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणतात, "मालिकांमधल्या नायिका म्हणजे आपल्याच आजूबाजूला दिसणाऱ्या, आपल्याच कुटुंबात असणाऱ्या बायका आहेत. बहिणी, पत्नी, आई, मुलगी, मैत्रीण... अनेक नात्यांमधून त्या आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात."
advertisement

स्टार प्रवाहचा अनोखा प्रयोग - 14 नायिका, एकत्र!

8 मार्च, जागतिक महिला दिन. या दिवशी स्टार प्रवाह वाहिनी एक अनोखा प्रयोग करत आहे. प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं, नवं देण्याचा प्रयत्न करणारी स्टार प्रवाह वाहिनी यावेळी एका खास सोहळ्याचे आयोजन घेऊन येत आहे.
advertisement
मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी, सलग 7 तास 'महानायिकांचा महासंगम'!चालणारा आहे. यामध्ये स्टार प्रवाहच्या 14 मालिकांमधल्या 14 नायिका एकत्र येणार आहेत. विश्वास, कर्तृत्व, प्रेम, आनंद, सहवास, कुटुंब, परंपरा, मान, अभिमान... या सगळ्या भावनांना उजाळा देत या 14 नायिका महिला दिन साजरा करणार आहेत.
advertisement
स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणतात, "स्त्री शक्ती आणि तिचं समाजातलं महत्व अनन्यसाधारण आहे. स्टार प्रवाह नेहमीच या शक्तीचा गौरव करत आला आहे. 8 मार्च रोजी महाराष्ट्राच्या या 14 महानायिका एकत्र येऊन एक नवी पर्वणी साजरी करणार आहेत. लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माते आणि स्टार प्रवाह वाहिनी एकत्र येऊन हा भव्य सोहळा रसिकांसाठी घेऊन येत आहेत."  8 मार्च रोजी, दुपारी 1 ते 3 आणि संध्याकाळी 6.30 ते 11.30 या वेळेत 'प्रवाह स्त्री शक्तीचा' हा विशेष महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
महिला दिनी मनोरंजनाचा महासंगम! तयार रहा, 14 मालिका सलग 7 तास पाहायला
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement