...अन् प्रेक्षकांची लाडकी 'आई' रडली, वाढदिवशी मधुराणीला चाहत्यांकडून खास गिफ्ट, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
madhurani prabhulkar birthday : मधुराणी प्रभुलकरने 'आई कुठे काय करते' मालिकेनंतर 'ज्याचा त्याचा विठ्ठल' नाटकात काम केले. तिच्या वाढदिवशी नाटकाचा पहिला प्रयोग हाऊसफुल्ल झाला आणि प्रेक्षकांच्या प्रेमाने ती भावूक झाली.
मुंबई : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर. मालिका संपली असली तरी मधुराणी अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मधुरामी सध्या तिच्या नाटकामुळे चर्चेत आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर मधुराणी लहान मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. मधुराणी आज तिचा वाढदिवस साजरा करतेय . तिच्या वाढदिवसाला तिचा खास गिफ्ट मिळालं आहे. ते म्हणजे प्रेक्षकांची पोचपावती. पाठीवर शाबासकीची थाप. इतकं कौतुक पाहून मधुराणी भावूक झाली. तिचा व्हिडीओ तिने शेअर केलाय ज्यात तिचे पाणावलेत.
आई कुठे काय करते ही मालिका संपल्यानंतर मधुराणी सध्या ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या नाटकात काम करत आहे. या नाटकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिच्या वाढदिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रेक्षकांनी नाटक पाहून मधुराणीचे कौतुक केले, तिला मिठी मारली. प्रेक्षकांचे इतके प्रेम पाहून मधुराणी देखील भावुक झाली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. या खास क्षणाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
मधुराणीने प्रयोगाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलंय, “हाऊसफुल्ल वाढदिवस… कृतज्ञ… निव्वळ कृतज्ञ… ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’. ‘शुभंकर वाट्याला यायचं, तर ओंजळ तर उघडी असायला हवी ना’, डॉ. समीर कुलकर्णी यांनी लिहिलेलं आमच्याच नाटकातलं हे वाक्य. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या विलक्षण संहितेचा आपण एक भाग असणं आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचा पहिला प्रयोग होणं ही त्या विठ्ठलाचीच कृपा. मी फक्त ओंजळ उघडी ठेवण्याचा अवकाश होता, हा योग होताच कदाचित. हाऊसफुल्ल गर्दीत झालेला खणखणीत प्रयोग, भारावलेली मनं आणि त्या दिवशी मिळालेले अनंत आशीर्वाद! कायम लक्षात राहील असा हा वाढदिवस! आणि काय हवं असतं एखाद्या कलाकाराला?”
advertisement
मधुराणीच्या या पोस्टवर तिच्या चाहिन्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 04, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
...अन् प्रेक्षकांची लाडकी 'आई' रडली, वाढदिवशी मधुराणीला चाहत्यांकडून खास गिफ्ट, VIDEO


