Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी गूड न्यूज! या तारखेपासून हिंजवडी मेट्रो धावणार; 2 तासाचा प्रवास अर्ध्या तासात
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यापीठ चौकात उभारलेला 'डबल डेकर' पूल. येथे जमिनीवर रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि त्याही वरून मेट्रो धावणार आहे.
पुणे: पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात रोज होणारी वाहतूक कोंडी आता लवकरच इतिहास जमा होणार आहे. 'पीएमआरडीए'च्या (PMRDA) वतीने उभारण्यात येत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या दोन महत्त्वाच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून, येत्या मार्चअखेर ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन तासांचा प्रवास आता अवघ्या अर्ध्या तासावर येणार आहे.
डबल डेकर पुलाचा खास प्रयोग
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यापीठ चौकात उभारलेला 'डबल डेकर' पूल. येथे जमिनीवर रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि त्याही वरून मेट्रो धावणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबवण्यात येणारा हा देशातील पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे. सुमारे ८,३१३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे मोठे आर्थिक योगदान लाभले आहे.
advertisement
आयटी कंपन्यांचा वनवास संपणार?
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये ८०० हून अधिक कंपन्या असून २ लाख २० हजार तरुण येथे कार्यरत आहेत. वाहतूक कोंडीमुळे अनेक कंपन्यांनी शहराबाहेर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, आता २३.२० किमी लांबीच्या या मार्गिकेवर २३ स्थानके असणार असून १४ ट्रेनसेट्स उपलब्ध झाले आहेत. रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO) कडून तांत्रिक मानकांची पडताळणी पूर्ण झाली असून आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
advertisement
प्रकल्पाचे फायदे:
वेळेची बचत: प्रवासाचा वेळ २ तासांवरून ३० मिनिटांवर येईल.
पर्यावरण पूरक: मेट्रोमुळे प्रदूषणाची पातळी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण घटेल.
कनेक्टिव्हिटी: हिंजवडी थेट शिवाजीनगरशी जोडले गेल्याने औद्योगिक कॉरिडॉरचा विकास होईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 12:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी गूड न्यूज! या तारखेपासून हिंजवडी मेट्रो धावणार; 2 तासाचा प्रवास अर्ध्या तासात






