'प्रिय अजितकाका...', अस्थि विसर्जनानंतर युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत, म्हणाले 'तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yugendra Pawar On Ajit Pawar Death : युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा फोटो शेअर केला. प्रिय अजित काका, तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो.
Yugendra Pawar On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती आणि येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना ही पोरकेपणाची झाली होती. परंतु, अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळालं. पण युगेंद्र पवार अजित काकांच्या जाण्याचा धक्क्यातून सावरले नाहीत, असंच चित्र पहायला मिळत आहे.
प्रिय अजितकाका...
युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा फोटो शेअर केला. प्रिय अजित काका, तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं, असं युगेंद्र पवार म्हणाले. अजित पवार युगेंद्र पवारांसाठी प्रेरणास्थान होते.
मी सदैव प्रयत्न करीत राहीन....
advertisement
तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन. तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील, मिस यू अजितकाका...!, अशी पोस्ट युगेंद्र पवार यांनी केली आहे.
प्रिय अजितकाका,
तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन.
तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील.
मिस यू अजितकाका...! pic.twitter.com/3UckfgRYiA
— Yugendra Shrinivas Pawar (@yugendraspeaks) January 31, 2026
advertisement
दरम्यान, बुधवारी झालेल्या विमान अपघातापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट चर्चेच्या प्रगत टप्प्यावर पोहोचले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका संपल्यानंतर लगेचच विलीनीकरणाची घोषणा करण्याची योजना होती. अजितदादांची रणनीती अशी होती की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि पूर्णपणे विलीनीकरणाची घोषणा करण्यापूर्वी दोन्ही पक्षांच्या मतपेढीला मजबूत करावे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 12:30 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'प्रिय अजितकाका...', अस्थि विसर्जनानंतर युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट चर्चेत, म्हणाले 'तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं...'









