advertisement

गुड न्यूज! महामुंबईत प्रवास स्वस्तात होणार, 100 नव्या लोकल धावणार, रेल्वेचा मास्टर प्लॅन समोर

Last Updated:

Mumbai Local: मुंबई महानगर परिसरात सध्या एकूण सुमारे 400 किलोमीटर लांबीचे उपनगरी रेल्वे प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहेत.

गुड न्यूज! महामुंबईत प्रवास स्वस्तात होणार, 100 नव्या लोकल धावणार, रेल्वेचा मास्टर प्लॅन समोर
गुड न्यूज! महामुंबईत प्रवास स्वस्तात होणार, 100 नव्या लोकल धावणार, रेल्वेचा मास्टर प्लॅन समोर
मुंबई: मुंबईतील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा कणा असलेल्या लोकल सेवेत मोठे बदल होण्याच्या तयारीत आहेत. सुरू असलेले उपनगरी रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी विना-वातानुकूलित लोकल सेवा कायम ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे.
मुंबई उपनगरी रेल्वेवर धावणाऱ्या अनेक लोकल गाड्या त्यांच्या निश्चित आयुर्मानाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने अशा गाड्या सेवेतून काढून टाकणे अपरिहार्य ठरणार असून, त्या जागी नवीन लोकल गाड्या दाखल कराव्या लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर, येत्या काळात किती विना-एसी लोकल आवश्यक असतील, याचा सविस्तर आढावा रेल्वे प्रशासन घेत आहे.
advertisement
400 किमी उपनगरी रेल्वे प्रकल्प सुरू
मुंबई महानगर परिसरात सध्या एकूण सुमारे 400 किलोमीटर लांबीचे उपनगरी रेल्वे प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहेत. यामध्ये नवीन उपनगरी मार्ग, विद्यमान मार्गांचे दुहेरीकरण, चौपदरीकरण तसेच मार्गांचे आधुनिकीकरण यांचा समावेश आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, 12 डब्यांच्या लोकल गाड्या भविष्यात 15 डब्यांच्या करण्यात येणार आहेत.
advertisement
या सर्व विकासकामांसाठी अंदाजे 18,364 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून, बहुतांश प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
एसी लोकल वाढणार, पण साध्या लोकल कायम
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (MRVC) आणखी 238 एसी लोकल गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातील पहिली एसी लोकल लवकरच धावण्याची शक्यता आहे. मात्र, एसी लोकल वाढत असल्या तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणारी साधी लोकल सेवा बंद होणार नाही, याची काळजी रेल्वे प्रशासन घेत आहे.
advertisement
प्राथमिक अंदाजानुसार, सन 2030 पर्यंत सुमारे 2030 विना एसी लोकल गाड्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे विना-एसी लोकल गाड्यांची संख्या टिकवून ठेवण्यावर रेल्वेचा भर आहे.
सध्याची लोकल सेवा – मध्य व पश्चिम रेल्वे
मध्य रेल्वे
रोजच्या फेऱ्या: 1820
एकूण गाड्या: 134
पश्चिम रेल्वे
रोजच्या फेऱ्या: 1406
एकूण गाड्या: 96
मध्य रेल्वेवरील प्रकल्प आणि पूर्ततेचे वेळापत्रक
1) सीएसएमटी–कुर्ला पाचवी व सहावी मार्गिका
advertisement
परळ–कुर्ला (10.1 km)
परळ–सीएसएमटी (7.4 km)
पूर्तता: 2029
2) नवा पनवेल–कर्जत उपनगरी मार्ग (29.6 km)
पूर्तता: मे 2026
3) कल्याण–आसनगाव चौथी मार्गिका (32 km)
पूर्तता: डिसेंबर 2026
कल्याण–बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका (14.05 km)
पूर्तता: डिसेंबर 2026
4) कल्याण–कसारा तिसरी मार्गिका (67 km)
पूर्तता: डिसेंबर 2026
5) बदलापूर–कर्जत तिसरी व चौथी मार्गिका (32 km)
advertisement
पूर्तता: 2030
6) आसनगाव–कसारा चौथी मार्गिका (35 km)
पूर्तता: 2027
पश्चिम रेल्वेवरील प्रकल्प आणि पूर्ततेचे वेळापत्रक
1) मुंबई सेंट्रल–बोरिवली सहावी मार्गिका (30 km)
अंशतः पूर्ण
2) गोरेगाव–बोरिवली हार्बर विस्तार (7.8 km)
गोरेगाव–मालाड: मार्च 2028
मालाड–बोरिवली: डिसेंबर 2028
3) बोरिवली–विरार पाचवी व सहावी मार्गिका (26 km)
पूर्तता: मार्च 2028
4) विरार–डहाणू तिसरी व चौथी मार्गिका (64 km)
advertisement
पूर्तता: डिसेंबर 2026
5) नायगाव–जुचंद्र दुहेरी कॉर्ड लाईन (6 km)
पूर्तता: मार्च 2028
मुंबई उपनगरी लोकल गाड्यांची सद्यस्थिती
1) मध्य रेल्वे:  12 डबे: 814 फेऱ्या – 79 गाड्या, 15 डबे: 80 फेऱ्या – 7 गाड्या
2) पश्चिम रेल्वे: 12 डबे: 1074 फेऱ्या – 72 गाड्या,  15 डबे: 211 फेऱ्या – 15 गाड्या,  AC लोकल: 121 फेऱ्या – 9 गाड्या
3) हार्बर रेल्वे : 12 डबे: 602 फेऱ्या – 41 गाड्या,  AC लोकल: 14 फेऱ्या – 1 गाडी
4) ट्रान्स हार्बर रेल्वे:  12 डबे: 262 फेऱ्या – 12 गाड्या
5) उरण मार्गिका :  12 डबे: 50 फेऱ्या – 4 गाड्या
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
गुड न्यूज! महामुंबईत प्रवास स्वस्तात होणार, 100 नव्या लोकल धावणार, रेल्वेचा मास्टर प्लॅन समोर
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement