Suresh Dhas on Prajakta Mali : मी प्राजक्ता ताईंचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी स्पष्टच सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suresh Dhas on Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानं झालेल्या गदारोळानंतर सुरेश धस यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. मी प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
मुंबई : भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. या टीकेनंतर एकच गदारोळ झाला. सुरेश धस यांच्यावर अनेकांनी आरोप केले. मराठी अभिनेत्रींना तुमच्या राजकारणात घेऊन ओढू नका, असं म्हणत मनसे नेते अमेय खोपकर यांनी सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं. प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानं झालेल्या गदारोळानंतर सुरेश धस यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. मी प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने सुरेश धस वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. सुरेश धस यांनी यासंदर्भातली आपली नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. सुरेश धस म्हणाले, “मी रश्मिका मंदाना, प्राजक्ताताई, सपना चौधरी यांची फक्त नावं घेतली. का घेतली? आता मराठवाड्यात प्रचंड पाऊस पडला. सगळ्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आणि तुम्ही कृषीमंत्री असून तिकडे रश्मिका मंदानांचा कार्यक्रम घेता?"
advertisement
( Prajakta Mali on Suresh Dhas : सुरेश धसांनी नाव घेतलं, प्राजक्ता माळी संतापली; घेतला मोठा निर्णय )
सुरेश धस पुढे म्हणाले, "तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे? त्यावर टीका झाली. राजू शेट्टीही इथे येऊन गेले. त्यांनीही टीका केली. धनंजय मुंडेंना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाही."
सुरेश धस प्राजक्ता माळीबद्दल नेमकं काय म्हणाले?
advertisement
धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत आणि राजकारणाबाबत सुरेश धस यांना विचारले असता, धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम..! रश्मिका मंदाना, लै कंबर हलवते ती सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे, येथून शिक्षण घ्यावे आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा, अशी उपहासात्मक टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 28, 2024 2:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Suresh Dhas on Prajakta Mali : मी प्राजक्ता ताईंचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी स्पष्टच सांगितलं








