तारक मेहताची जुनी अंजली आता नव्या शोमध्ये दिसणार, हटके लूक अन् स्वॅग पाहून व्हाल अवाक्

Last Updated:

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत अंजलीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली नेहा मेहता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे.

तारक मेहताची जुनी अंजली आता नव्या शोमध्ये दिसणार
तारक मेहताची जुनी अंजली आता नव्या शोमध्ये दिसणार
मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत अंजलीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली नेहा मेहता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. पण या वेळी तिची भूमिका अगदी वेगळी आहे. तारक मेहतानंतर आता अंजली भाभी नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा नवा अंदाज पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
नेहा मेहता सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ या मालिकेत झळकणार आहे आणि तिचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या मालिकेत दिवेकर कुटुंबाच्या नात्यांचा प्रवास दाखवला आहे. प्रेम, संघर्ष, गैरसमज आणि भावनांची एक सुंदर कहाणी. यात नेहा साकारणार आहे हेतल नावाची झकास, बोलकी आणि नेहमी लक्ष वेधून घेणारी स्त्री. हेतलचं आगमन मालिकेत नव्या नाट्याचा आणि हसवणाऱ्या प्रसंगांचा तडका लावणार आहे.
advertisement
हेतलची ही व्यक्तिरेखा स्टायलिश आणि आत्मविश्वासू आहे, पण तिच्या आत अनेक असुरक्षितता दडलेल्या आहेत. ती स्वतःच्या प्रतिमेबद्दल जागरूक असते, आणि अनेकदा “परफेक्ट” दिसण्यासाठी स्वतःलाच ओझं करते. मात्र, तिच्या या नाट्यमय स्वभावामुळे घरात निर्माण होणारा गोंधळच मालिकेचा मुख्य मजा आहे.
advertisement
नेहा मेहता म्हणते, "हे पात्र माझ्यासाठी एकदम नवीन आहे. हेतल उत्साही, नाट्यमय आणि मजेशीर आहे पण तिच्या कमतरतांसह. ती ग्लॅमरस असली तरी मनाने नाजूक आहे. ‘इत्ती सी खुशी’ हा शो हृदयस्पर्शी भावना आणि हलक्या फुलक्या क्षणांनी भरलेला आहे, त्यामुळे मला या भूमिकेची मजा घेता येणार आहे."












View this post on Instagram























A post shared by Sony SAB (@sonysab)



advertisement
दरम्यान,'तारक मेहता'तून अचानक बाहेर पडल्यावर नेहा काही काळ इंडस्ट्रीपासून दूर होती. आता ‘इत्ती सी खुशी’द्वारे ती पुन्हा एकदा चमकणार आहे. तिचा हा नवा लूक आणि आत्मविश्वास प्रेक्षकांना पुन्हा मोहवेल यात शंका नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
तारक मेहताची जुनी अंजली आता नव्या शोमध्ये दिसणार, हटके लूक अन् स्वॅग पाहून व्हाल अवाक्
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement