The Family Man S3 Trailer: 'श्रीकांत तिवारी'च बनला मोस्ट वाँटेड क्रिमिनल, मग कशी करणार देशाची रक्षा? जबरदस्त ट्रेलर रिलीज
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
The Family Man Trailer : सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतीक्षित सिरीज 'द फॅमिली मॅन' चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अखेर प्राइम व्हिडीओने या सिरीजचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च केला आहे.
मुंबई: भारतातील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतीक्षित सिरीज 'द फॅमिली मॅन' चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अखेर प्राइम व्हिडीओने या सिरीजचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च केला आहे. मुंबईत झालेल्या एका शानदार मीडिया इव्हेंटमध्ये, राज आणि डीके यांच्या या रोमांचक थ्रिलर सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
तिसऱ्या सिझनचं वैशिष्ट्य असं की यावेळी डिटेक्टिव्ह श्रीकांत तिवारी केवळ धोकादायक शत्रूंशीच नाही, तर स्वतःच्या इंटेलिजन्स युनिटपासूनही पळताना दिसणार आहे. यंदा परिस्थिती पूर्णपणे बदलली असून आता शिकारी स्वतःच शिकार बनणार आहे.
२१ नोव्हेंबरला प्रीमियर
'द फॅमिली मॅन सिझन ३' चा प्रीमियर २१ नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडीओवर होणार आहे आणि हा शो जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये उपलब्ध असेल. राज आणि डीके यांनी या सिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे, तर या सिझनमध्ये सुमन कुमार आणि तुषार सेठ देखील दिग्दर्शक म्हणून जोडले गेले आहेत.
advertisement
'श्रीकांत तिवारी'च्या मुख्य भूमिकेत मनोज बाजपेयी असतील. त्यांच्यासोबत या सिझनमध्ये जयदीप अहलावत (रुक्मा) आणि निम्रत कौर (मीरा) हे दोन नवीन खतरनाक व्हिलन दिसणार आहेत.
चाहत्यांचे आवडते कलाकार शारिब हाश्मी (जीके तळपदे), प्रियमणी (सुचित्रा), अश्लेषा ठाकूर (धृती), वेदांत सिन्हा (अथर्व), श्रेया धन्वंतरी (झोया) आणि गुल पनाग (सलोनी) हे देखील दिसणार आहेत.
advertisement
तिवारीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका
ट्रेलर पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, श्रीकांत तिवारीचे आयुष्य यावेळी नियंत्रणाबाहेर गेले आहे. रुक्मा आणि मीरा यांच्यासारखे नवीन आणि अत्यंत धोकादायक शत्रू श्रीकांतच्या मागे लागले आहेत. केवळ स्वतःच्या कुटुंबालाच नाही, तर देशालाही एका मोठ्या संकटातून वाचवण्याची जबाबदारी श्रीकांतवर आहे.
advertisement
विनोदी संवाद, जबरदस्त अॅक्शन, पाठलाग आणि श्रीकांतचे वैयक्तिक आणि गुप्त आयुष्य यातील सततचा संघर्ष, अशा अनेक रोमांचक गोष्टींचा समावेश या सिरीजमध्ये आहे. अभिनेता मनोज बाजपेयी यांनी सिझनबद्दल बोलताना प्रचंड उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, "गेली चार वर्षे चाहते मला सतत विचारत होते, 'श्रीकांत तिवारी कधी येतोय?' आता अखेर त्याचे उत्तर मिळाले आहे."
advertisement
मनोज बाजपेयी म्हणाले, "यावेळी श्रीकांत अशा परिस्थितीत आहे, जिथून सुटण्याचा त्याच्याकडे कोणताही मार्ग नाही. तिसऱ्यांदा ही भूमिका साकारणे माझ्यासाठी घरी परतण्यासारखे होते." निम्रत कौरनेही या सिरीजचा भाग असणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे असल्याचे म्हटले आहे, आणि तिचे 'मीरा' हे पात्र रोमांचक पण आव्हानात्मक असल्याचे सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2025 3:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
The Family Man S3 Trailer: 'श्रीकांत तिवारी'च बनला मोस्ट वाँटेड क्रिमिनल, मग कशी करणार देशाची रक्षा? जबरदस्त ट्रेलर रिलीज


