आईचा शेवटचा फोन उचलला नाही, 45 दिवसात वडिलही गेले, 'द कपिल शर्मा शो' अभिनेत्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर

Last Updated:

Kiku Sharda : 'द कपिल शर्मा शो' कीकू शारदा सध्या 'राइज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे. अशातच विनोदवीराने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.

News18
News18
Kiku Sharda : 'द कपिल शर्मा शो' फेम विनोदवीर कीकू शारदा सध्या 'राइज अँड फॉल' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील त्याचा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशातच अभिनेत्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही सत्यघटना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. 'राइज अँड फॉल'चा नुकताच पार पडलेला एपिसोड भावनांनी, अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. नूरिन शा आणि संगीत फोगट या दोन स्पर्धकांना या कार्यक्रमाचा निरोप घ्यावा लागला. संगीत फोगट कौटुंबिक कारणाने या कार्यक्रमातून बाहेर पडल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांसोबत नुकताच वर्कर बनलेल्या विनोदवीर कीकू शारदाही मोठा धक्का बसलाय. त्यावेळी त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक दु:खद प्रसंग चाहत्यांसोबत शेअर केला.
'राइज अँड फॉल' या कार्यक्रमातील एका भावनिक चर्चेदरम्यान कीकू शारदा म्हणाला,"मी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत होतो आणि माझ्या आईचं निधन झालं. मला आजही या गोष्टीचं खूप दुःख आहे की, मला तिच्या शेवटच्या कॉलला उत्तर देता आलं नाही. त्यावेळी मी विचार केला, उद्या कॉल करेन... पण दुसऱ्या दिवशी सकाळी आई या जगात नव्हती". अश्रू अनावर झालेला कीकू पुढे म्हणाला,"आईच्या निधनानंतर 45 दिवसांनी त्याच्या वडिलांचंही निधन झालं. हे दुःख सहन करू शकत नाहीत. एका वयानंतर सोबत हवी असते. माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपल्या जवळच्या लोकांच्या संपर्कात रहा, त्यांना कॉल करा, वेळ द्या... हे क्षण पुन्हा परत येत नाहीत."
advertisement
कीकूच्या दु:खात कुब्रा सैत सहभागी
कीकूने आपलं दु:ख शेअर केलं. यावेळी उपस्थित असलेली 'सेक्रेड गेम्स' फेम कुब्रा सैत म्हणाली,"तुम्ही एका ठिकाणी आहात आणि दुसऱ्या ठिकाणी काही वाईट घडलं, तर ते सगळ्यात वाईट असतं.". यावेळी इतर स्पर्धक संगीताच्या दु:खात सहभागी झालेले पाहायला मिळाले. वीकेंडला शोचे होस्ट अशनीर ग्रोव्हर यांनी सर्व स्पर्धकांशी त्यांच्या परफॉर्मन्स आणि वागणुकीबाबत चर्चा केली. अरबाज पटेलच्या मारहाणीच्या घटनेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारच्या वागणुकीला अजिबात सहन केले जाणार नाही. त्यांनी इशारा दिला की, अशा गोष्टी पुन्हा घडल्यास संबंधित स्पर्धकाला शोमधून बाहेर काढण्यात येईल.
advertisement
अर्जुन बिजलानी नवा रूलर
टास्क जिंकल्याने अर्जुन बिजलानीला नवा रूलर होता आलं आहे. त्यामुळे अर्जुन आता पेंटहाऊसमध्ये रवाना झाला आहे. आपल्या खेळाने अर्जुनने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एकीकडे स्पर्धेसाठी काहीही करायला तयार असणारे स्पर्धक दुसरीकडे एकमेकांच्या भावनांचाही आदर करताना दिसत आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
आईचा शेवटचा फोन उचलला नाही, 45 दिवसात वडिलही गेले, 'द कपिल शर्मा शो' अभिनेत्यावर कोसळलेला दुःखाचा डोंगर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement