Drishyam 3: थरार, ट्विस्ट आणि ड्रामा, सस्पेन्सचा ट्रिपल डोस; 'दृश्यम 3' विषयी समोर आली मोठी अपडेट

Last Updated:

Drishyam 3: सस्पेन्स थ्रिलर सिनेमा-सीरीजची सध्या खूप क्रेझ आहे. एकापाठोपाठ एक असे सिनेमे रिलीज होत आहेत. अशातच ब्लॉकबस्टर सिनेमा 'दृश्यम'ने तर प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं आहे.

 'दृश्यम 3' विषयी मोठी अपडेट
'दृश्यम 3' विषयी मोठी अपडेट
मुंबई : सस्पेन्स थ्रिलर सिनेमा-सीरीजची सध्या खूप क्रेझ आहे. एकापाठोपाठ एक असे सिनेमे रिलीज होत आहेत. अशातच ब्लॉकबस्टर सिनेमा 'दृश्यम'ने तर प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं आहे. अशातच आता या सिनेमाच्या सिक्वलविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
'दृश्यम 3' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. चित्रपटाचा मुख्य नायक मोहनलाल यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी पूजा सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. दिग्दर्शक जीतू जोसेफ आणि निर्माता अँटनी पेरूंबावूर यांच्यासोबत ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
advertisement
सोमवारी सकाळी मोहनलाल यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये ते क्लॅपबोर्ड हातात धरून आणि संपूर्ण टीमसोबत सेटवर पूजा करताना दिसतात. फोटोसोबत त्यांनी लिहिलं, “पुन्हा एकदा जॉर्ज कुट्टीच्या जगात परत. आज ‘दृश्यम 3’ चा शुभारंभ पूजेसह झाला.”
मोहनलालचा जॉर्ज कुट्टी हा पात्र प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर घर करून बसला आहे. 2013 मध्ये आलेल्या दृश्यम पासून ते दृश्यम 2 पर्यंत या मालिकेने थरार आणि भावनांचा अनोखा मेळ घालून जबरदस्त यश मिळवलं. इतकंच नव्हे तर या कथेचं वेड इतकं पसरलं की ती हिंदीसह अनेक भाषांमध्ये रिमेक करण्यात आली. अजय देवगणने हिंदी आवृत्तीत मोहनलालची भूमिका साकारून ती फ्रँचायझी हिंदी प्रेक्षकांसमोर नेली.
advertisement
आता तर ही कथा आंतरराष्ट्रीय पातळीवर झेपावतेय. दृश्यम लवकरच कोरियन भाषेतही बनवली जाणार असून, दिग्दर्शन सुप्रसिद्ध फिल्ममेकर देवक नोह करणार आहेत. यापूर्वी त्यांनी व्हेरी ऑर्डिनरी कपल या रोमँटिक कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Drishyam 3: थरार, ट्विस्ट आणि ड्रामा, सस्पेन्सचा ट्रिपल डोस; 'दृश्यम 3' विषयी समोर आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement