‘तिघांना एकत्र काम करायला फार मज्जा येते’, ठरता ठरता ठरेना येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा टीम सोबत खास मुलाखत

Last Updated:

ठरता ठरता ठरेना हे नाटक येत्या 7 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाच्या मुख्य भूमिकेत सागर देशमुख, वनिता खरात आणि शंतनू रांगणेकर ही कलाकार मंडळी दिसणार आहे.

+
ठरता

ठरता ठरता ठरेना या नाटकाच्या टीम बरोबर मुलाखत

निकिता तिवारी, प्रतिनिधी 
मुंबई : मराठी रंगभूमीने आतापर्यंत मोठे मोठे मराठी कलाकार घडवले आहेत. याच मराठी रंगभूमीवर आता एक धमाल विनोदी नाटक सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. ठरता ठरता ठरेना हे नाटक येत्या 7 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाच्या मुख्य भूमिकेत सागर देशमुख, वनिता खरात आणि शंतनू रांगणेकर ही कलाकार मंडळी दिसणार आहे. लग्नासाठी कुटुंबाची धडपड सुरू असणारे आणि 30 वय पार केलेले शोभना (वनिता खरात) आणि रामचंद्र (सागर देशमुख) यांची ही गोष्ट आहे.
advertisement
दोघेही त्यांच्या आयुष्यात व्यवस्थित सेटल असले तरी त्यांच्या घरच्यांना त्यांच्या लग्नाची फार घाई असते आणि या सर्वात येतो तो एक सूत्रधार. शांतनू रांगणेकर या नाटकात आपल्याला सूत्रधाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. शोभना आणि रामचंद्रचे लग्न ठरते की नाही ह्या दोघांची भेट होईल की नाही या सगळ्या गोष्टींची दखल शांतनू घेणार आहे.
advertisement
आम्ही तिघे एकत्र येणार हे कळल्यावर मी पहिला फोन वनिताला केला होता, कारण व्यावसायिक नाटक करण्याची माझी पहिली वेळ होती. त्यामुळे मला दडपण आले होते, असं शांतनू रांगणेकर म्हणाला. तसेच वनिता म्हणाली की सागरची ऑन स्टेज एनर्जी कमाल आहे. सागर देशमुख म्हणाला की आम्हाला तिघांना एकत्र काम करायला फार मज्जा येते.
advertisement
ठरता ठरता ठरेना या नाटकाच्या नावातच एक वेगळेपण आपल्याला दिसते. या दोघांच्याही लग्नाच्या गोष्टी लग्नाच्या तारखा ठरणार आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र मुलगा मुलगी बघण्याच्या या प्रवासाला एका कॉमेडीचा तडका देखील लाभला आहे. सागर देशमुख, वनिता खरात आणि शांतनू रांगणेकर या तिघांनी आतापर्यंत फार वेगवेगळ्या पठाडीच्या भूमिका केल्या आहेत. मात्र या तिघांना एकत्र पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल.
advertisement
ठरता ठरता ठरेना या नाटकाची निर्मिती गोपाळ मराठे यांनी केली असून लिखाण अक्षय स्मिता श्रीनिवास तसेच दिग्दर्शन स्वप्नील बारस्कर, साह्य दिग्दर्शक नितीन जाधव यांनी केले आहे. या नाटकाचे संगीत अभिजीत पेंढारकर, नेपथ्य प्रसाद वालावलकर, प्रकाश योजना अमोघ फडके, गीते वलय मुळगुंद, अक्षय स्मिता श्रीनिवास आणि नृत्य दिग्दर्शन मयूर वैद्य यांनी केलं आहे. सागर देशमुख, वनिता खरात, शंतनू रांगणेकर, मृणाल मनोहर, अर्पिता घोगरदरे, प्रदीप जोशी ही कलाकार मंडळी आपल्याला नाटकात दिसणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
‘तिघांना एकत्र काम करायला फार मज्जा येते’, ठरता ठरता ठरेना येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पाहा टीम सोबत खास मुलाखत
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement