ऑनलाइन फ्रॉडमध्ये नेहा कक्करचं नाव, वरळी बीडीडीतील महिला वकिलाला 5 लाखांचा गंडा, प्रकरण काय?

Last Updated:

Neha Kakkar Cyber Fraud : वरळीच्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या एका महिला वकिलाला 5 लाखांचा गंड घालण्यात आला आहे. गायिका नेहा कक्करचं नाव यात समोर आलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे?

News18
News18
बॉलिवुडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीचं नाव सायबर फ्रॉडमध्ये आलं आहे.  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या सायबर फसवणुकीचा तपास करत आहेत. मुंबईत ऑनलाइन फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी फसवणूक करणाऱ्यांनी सायबर फसवणुकीसाठी बॉलीवूड गायिका नेहा कक्करचं नाव वापरण्यात आलं आहे. बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म FXOnet द्वारे एका महिला वकिलाला 5 लाख रुपयांचा गंडा घातला आहे.  महिलेचे पैसे गेल्यानंतर तिला कळलं की आपली फसवणूक झाली आहे. या प्रकरणी तिने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस या सायबर फसवणुकीचा तपास करत आहेत. वरळी पोलिसांनी आयटी कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत तपास सुरू केला आहे.
पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरनुसार, शबनम मोहम्मद हुसेन सय्यद असं पीडितेचं नाव आहे. त्या पेशानं वकील आहे. शबनम यांनी जून 2025 मध्ये इंटरनेटवर काही व्हिडिओ आणि आर्टिकल सापडले ज्यामध्ये नेहा कक्कर FXOnet ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून दाखवण्यात आलं होतं.  बनावट व्हिडिओ आणि पोस्टने FXOnet चा विश्वसनीय आणि कायदेशीर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म म्हणून देखील प्रचार केला. हे पाहून शबनम सय्यद यांना खात्री पटली आणि त्यांनी FXOnet साठी काम करणाऱ्या विजय आणि जिमी डिसूझा या दोन व्यक्तींशी संपर्क साधला. त्यांच्या मार्फत हे प्रकरण सुरू झालं आणि महिला वकिलाची फसवणूक झाली.
advertisement
पीडितेच्या मते फसवणूक करणाऱ्यांनी ट्रेडिंग खाते उघडण्याचे आणि त्यात पैसे गुंतवण्याचं आश्वासन दिलं होतं. शिवाय, त्यांनी तिला दररोज एक्सपर्ट इन्व्हेस्टमेन्ट टीप्सही दिल्या. यावर विश्वास ठेवून शबनम यांनी 18 जून ते 9 ऑक्टोबर 2025 दरम्यान तिच्या HDFC बँक खात्यातून राजेश कन्नन (PONNURAKU@SUPERYES), VPI ProMedia Kigali, India Impex Trading Company आणि VPI 361 VPECOM सारख्या नावांच्या अनेक खात्यांमध्ये एकूण 502.025 रुपये ट्रान्सफर केले.  काही काळानंतर जेव्हा तिला कोणताही नफा दिसला नाही किंवा पैसे मिळाले नाहीत तेव्हा तिला काहीतरी गडबड असल्याचा संशय येऊ लागला.
advertisement
घडलेल्या प्रकरणाची वरळी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे शोधण्यासाठी टेलिग्राम चॅट्स, झूम रेकॉर्डिंग्ज आणि बँक व्यवहारांची चौकशी करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ऑनलाइन फ्रॉडमध्ये नेहा कक्करचं नाव, वरळी बीडीडीतील महिला वकिलाला 5 लाखांचा गंडा, प्रकरण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement