Yogita - Saurabh Divorce News : एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे योगिता-सौरभ एकाच रेडकार्पेटवर, Video आला समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Yogita Chavan - Saurabh Choughule Divorce News :एकीकडे डिवोर्सच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे योगिता आणि सौरभ एकाच रेड कार्पेटवर दिसले. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
'जीव माझा गुंतला' मालिकेतील मल्हार आणि अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेत्री सौरभ चौघुले यांनी डिवोर्स घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघांनी त्यावर अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही पण त्यांच्या काही कृतींमधून त्याच्या डिवोर्सच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. एकीकडे डिवोर्सच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे योगिता आणि सौरभ एकाच रेड कार्पेटवर दिसले. दोघांचे व्हिडीओ समोर आले असून चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.
advertisement
नुकताच महेश मांजरेकर दिग्दर्शत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच आयोजित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या प्रीमियरला अनेक कलाकार मंडळींना आमंत्रण देण्यात आलं होतं. अनेक कलाकार प्रीमियरला जमले होते. याच प्रीमियरला अभिनेत्री योगिता आणि सौरभ यांनीही हजेरी लावली होती. दोघांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
( रील ते रिअल लाईफ 'हमसफर'! बोटीवर फिल्मी स्टाइल प्रपोज, कशी सुरू झालेली सौरभ-योगिताची Love Story? )
सौरभ आणि योगिता जरी एकाच रेड कार्पेटवर दिसले असले तरी त्यांनी एकत्र फोटोसाठी पोझेस दिल्या नाहीत. दोघेही एकाच ठिकाणी पण वेगवेगळे आले होते. कोणत्याच व्हिडीओमध्ये ते एकत्र दिसले नाहीत पण ते एकाच ठिकाणी उपस्थित होते. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या प्रीमियरसाठी सौरभ ब्लॅक कलरचा फ्लोलर शर्ट घालून आला होता. तर योगिता व्हाइट नेटच्या साडीत दिसली. दोघेही आनंद असल्याचं दिसत होतं.
advertisement
advertisement
सौरभ आणि योगिता यांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केलं आहे. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नाचे सगळे फोटोही डिलिट केलेत. लग्नानंतरचे दोघांचे सगळे एकत्र फोटो डिलिट करण्यात आलेत. केवळ त्याच्या मालिकेतील एकत्र फोटो दोघांच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आता एकाच रेड कार्पेटवर दोघे वेगवेगळे आल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या डिवोर्सच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. दरम्यान 'न्यूज18 मराठी' ने योगिताशी संपर्क साधला असला तिने पर्सनल लाइफबद्दल बोलायचं नाही असं म्हणत बोलणं टाळलं.
advertisement
'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या सेटवर दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. अभिनेत्री योगिता आणि सौरभ यांनी दोघांनी मालिका संपल्यानंतर मार्च 2024 मध्ये लग्न केवलं. पण आता लग्नाच्या एक वर्षातच दोघांचं बिनसल्याचं दिसतंय. दोघांनी अधिकृतरित्या डिवोर्सवर भाष्य केलेलं नाही पण डिवोर्सच्या चर्चा समोर आल्यानंतर चाहत्यांना नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 8:36 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Yogita - Saurabh Divorce News : एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे योगिता-सौरभ एकाच रेडकार्पेटवर, Video आला समोर


