पृथ्वीवर कोण पाठवतायत सिग्नल? नव्या इंटरस्टेलर ऑब्जेक्टच्या शोधामुळे वैज्ञानिक हादरले, डार्क फॉरेस्ट थिअरी सत्यात उतरल्याची भीती
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Science News: हार्वर्डचे एवी लोएब यांनी 3I/ATLAS हा एलियन टेक्नॉलॉजी असल्याचा दावा केला आहे. NASA च्या ATLAS टेलिस्कोपद्वारे शोधलेला हा पिंड 20 किमी लांब आहे.
अलीकडे अंतराळ वैज्ञानिकांनी 3I/ATLAS नावाचा एक नवा इंटरस्टेलर ऑब्जेक्ट (ताऱ्यांमधून आलेला बाह्य खगोलीय पिंड) शोधला आहे. या शोधामुळे विज्ञान विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मात्र सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ एवी लोएब यांनी दावा केला आहे की, हा कुठलाही सामान्य उल्कापिंड नसून ही एक एलियन टेक्नॉलॉजी असू शकते. जी मुद्दामहून आपल्या सौरमालेकडे पाठवली गेली आहे.
ही गोष्ट फक्त खगोलभौतिकशास्त्रापुरती मर्यादित नाही. तर जर हा दावा खरा ठरला तर तो मानवजातीसाठी अनोळखी धोका ठरू शकतो.
3I/ATLAS नेमका आहे तरी काय?
NASA च्या ATLAS टेलिस्कोपद्वारे या पिंडाचा शोध लागला. हा आतापर्यंतचा तिसरा इंटरस्टेलर पिंड आहे जो आपल्या सौरमालेत घुसलेला आढळला आहे. मात्र याचा आकार इतका प्रचंड आहे की, तो आतापर्यंतचा सर्वात मोठा बाह्य पिंड मानला जातो – जवळपास २० किलोमीटर लांब.
advertisement
या पिंडाच्या सभोवती गॅस आणि धुळीचा जाड थर आहे. जो याची रचना संशयास्पद बनवतो. या पिंडाची दिशा, गती आणि रचना नैसर्गिक पिंडांप्रमाणे नाही. त्यामुळे हे शक्य आहे की ही रचना एखाद्या प्रगत एलियन संस्कृतीने मुद्दामहून पृथ्वी किंवा सूर्याजवळ पाठवली असावी असे एवी लोएब म्हणाले.
“डार्क फॉरेस्ट थिअरी”: ब्रह्मांडातील सगळ्यात भीतीदायक कल्पना?
लोएब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनेला ‘डार्क फॉरेस्ट हायपोथेसिस’ शी जोडले आहे. या सिद्धांतानुसार ब्रह्मांडात असंख्य एलियन संस्कृती अस्तित्वात असू शकतात. परंतु त्या एकमेकांपासून लपतात, जेणेकरून सामूहिक नाश टाळता येईल.
advertisement
जर 3I/ATLAS खरंच अशाच एखाद्या संस्कृतीचा पाठवलेला संकेत असेल तर शांत ग्रह पृथ्वी सुद्धा धोक्यात येऊ शकतो. लोएब यांनी इशारा दिला आहे की- जर हा सिद्धांत खरा ठरला, तर मानवजातीवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
वैज्ञानिक समुदायात मतभेद
एकीकडे लोएब या पिंडाला एलियन टेक मानतात, तर दुसरीकडे अनेक वैज्ञानिक यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या मते हा एक जुना, बाहेर फेकलेला अंतराळीय पिंड असू शकतो. जो दूरच्या ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे इकडे वळवला गेला. मात्र लोएब यांचं म्हणणं आहे की- जोपर्यंत या पिंडाचे सगळे डेटा समोर येत नाहीत. तोपर्यंत कुठलाही निष्कर्ष लावणं ही घाई होईल.
advertisement
डिसेंबरमध्ये हा 3I/ATLAS पृथ्वीपासून सुमारे 270 मिलियन किमी अंतरावरून जाणार आहे. आणि त्यावेळी वैज्ञानिक त्याची अधिक बारीक निरीक्षणं करणार आहेत.
खरंच एलियन आपल्याकडे पाहत आहेत का?
3I/ATLAS विषयी चर्चा म्हणूनच भयावह वाटते कारण हा पहिलाच असा पिंड नाही. याआधीही 1I/Oumuamua या पिंडाला लोएब यांनी एलियन यान म्हटलं होतं. जरी तो सिद्ध न झालेला असला तरी पुन्हा पुन्हा असे पिंड येणं हा एक संकेत असू शकतो की कोणीतरी आपल्याला पाहतंय.
advertisement
हे मिशन असू शकतात का?
आपण एखाद्या ब्रह्मांडीय सर्वेचा भाग बनलो आहोत का?
की पृथ्वी आता एखाद्या 'कॉन्टॅक्ट' साठी तयार केली जात आहे?
हा दावा जर खरा ठरला तर तो मानव इतिहासातील सर्वात मोठी शोध असेल किंवा सर्वात मोठा धोका. आता संपूर्ण वैज्ञानिक जगताची नजर 3I/ATLAS च्या गूढावर खिळली आहे. कारण या पिंडाची खरी ओळख ठरवेल की आपण खरोखर ब्रह्मांडात एकटे आहोत का?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 18, 2025 10:54 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
पृथ्वीवर कोण पाठवतायत सिग्नल? नव्या इंटरस्टेलर ऑब्जेक्टच्या शोधामुळे वैज्ञानिक हादरले, डार्क फॉरेस्ट थिअरी सत्यात उतरल्याची भीती