जगभरात दिसतात पण भारतात कसे ब्लॉक होतात पाकिस्तान अकाउंट, देशनिहाय ब्लॉकिंग गणित काय?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Geo Blocking: जगभरात लोकप्रिय असलेल्या Instagram वर अनेकदा काही पोस्ट्स विशिष्ट देशांमध्ये दिसत नाहीत. यामागे 'जिओ-ब्लॉकिंग' नावाचं तंत्रज्ञान काम करतं. ज्यामुळे स्थानिक कायदे आणि सरकारी नियमांनुसार कंटेंट देशनिहाय ब्लॉक केला जातो.
Instagram हे आज जगभरात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. पण काही वेळा असे होते की एखादं अकाउंट, पोस्ट किंवा व्हिडिओ तुमच्या देशात दिसतच नाही. पण इतर देशांमध्ये ते सहज पाहता येते. असं का होतं? यामागे आहे 'जिओ-ब्लॉकिंग' किंवा देशनिहाय ब्लॉकिंगचं तंत्र आणि Instagram चा स्थानिक कायद्यांप्रती असलेला आदर.
देशनिहाय ब्लॉकिंग म्हणजे काय?
देशनिहाय ब्लॉकिंग म्हणजे Instagram किंवा Meta कंपनी विशिष्ट कंटेंट फक्त काही देशांमध्येच ब्लॉक करते. म्हणजेच एकच पोस्ट, व्हिडिओ किंवा अकाउंट भारतात ब्लॉक असते. पण यूएस किंवा यूकेमध्ये सहज पाहता येतो.
Instagram देशनिहाय ब्लॉकिंग का करतो?
Instagram खालील प्रमुख कारणांमुळे देशनिहाय ब्लॉकिंग करते:
सरकारी विनंतीनुसार: जर एखाद्या देशाच्या सरकारने Instagram ला तक्रार केली की एखादी पोस्ट किंवा अकाउंट त्यांच्या कायद्याच्या विरोधात आहे.
advertisement
कायदेशीर तक्रारीनंतर: स्थानिक नागरिक किंवा संस्था Instagram कडे तक्रार करू शकतात.
स्थानिक नियम Instagram च्या जागतिक पॉलिसीपेक्षा वेगळे असणे: जसे की एखादं व्यंगचित्र किंवा राजकीय भाष्य.
Instagram तांत्रिकदृष्ट्या ब्लॉकिंग कशी करतो?
Instagram यूजरचा देश ओळखतो त्याच्या IP पत्ता, मोबाईल नेटवर्क, सिम कार्ड, आणि फोनच्या सेटिंग्सवरून. यावरून तो ठरवतो की कोणत्या देशात कोणता कंटेंट दाखवायचा आणि कोणता लपवायचा.
advertisement
समजून घ्या सोप्या भाषेत
समजा एक व्यंगचित्रकार Instagram वर राजकीय पोस्ट शेअर करतो. एखाद्या देशाला ती पोस्ट आक्षेपार्ह वाटते आणि त्या देशाचं सरकार Instagram ला ती पोस्ट त्यांच्या देशात ब्लॉक करण्याची विनंती करते. त्यामुळे ती पोस्ट भारत, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये दिसते. पण त्या देशात ती ‘Unavailable in your region’ असं दाखवते.
advertisement
तुम्ही रिपोर्ट करू शकता का?
हो. जर तुम्हाला वाटत असेल की एखादा कंटेंट तुमच्या देशाच्या कायद्याचं उल्लंघन करत आहे. तर तुम्ही Instagram चं ‘Report’ बटण वापरून तक्रार करू शकता. Instagram त्यावर चौकशी करून तो कंटेंट देशनिहाय ब्लॉक करू शकतो.
तुमचं अकाउंट एखाद्या देशात ब्लॉक होऊ शकतं का?
हो. जर तुमच्या पोस्टमुळे एखाद्या देशात कायद्यानुसार अडचण निर्माण झाली. तर Instagram तुमचं अकाउंट त्या देशात लपवू शकतो. इतर देशांमध्ये ते अकाउंट सामान्यपणे चालू राहतं.
advertisement
Instagram हे जागतिक प्लॅटफॉर्म आहे. पण त्याला प्रत्येक देशाचे कायदे आणि सांस्कृतिक मूल्यांचा सन्मान करावा लागतो. म्हणूनच Instagram संपूर्ण कंटेंट डिलीट करत नाही. पण तो विशिष्ट देशापुरता ब्लॉक करू शकतो. जर तुम्हाला एखादं पोस्ट किंवा अकाउंट दिसेनासं झालं तर ते तुमच्या देशापुरतं ब्लॉक करण्यात आलं असण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 02, 2025 5:18 PM IST
मराठी बातम्या/Explainer/
जगभरात दिसतात पण भारतात कसे ब्लॉक होतात पाकिस्तान अकाउंट, देशनिहाय ब्लॉकिंग गणित काय?