मंगळावर जीवसृष्टी आहे का नाही? शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी तयार केलं 'हे' नवं यंत्र, मानवी रक्तातील या घटकाचा केलाय वापर
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
शास्त्रज्ञ मंगळावर जीवनाचा शोध घेण्यासाठी मानवी रक्तातील रसायन एल-सेरिनचा वापर करणार आहेत. हे रसायन सूक्ष्मजीवांना आकर्षित करते, ज्यामुळे त्यांचा शोध घेणे सोपे होईल.
मंगळावर जीवसृष्टी आहे का नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर जीवसृष्टी आढळण्याची शक्यता कमी असली, तरी वैज्ञानिकांचा विश्वास आहे की मंगळाच्या आतल्या थरांमध्ये द्रव स्वरूपातील पाणी आणि किमान सूक्ष्मजीव असू शकतात. याची खातरजमा करण्यासाठी वैज्ञानिकांनी एक नवीन पद्धत शोधली आहे, ती म्हणजे माणसाच्या रक्तामध्ये आढळणाऱ्या एका विशिष्ट रसायनाचा वापर करून मंगळावरचे जीव शोधण्याचा प्रयत्न!
विशेष उपकरण तयार करण्याचा प्रयत्न
ॲस्ट्रोबायोलॉजिस्ट अशा उपकरणांवर काम करत आहेत, जे मंगळावर असलेल्या सूक्ष्मजीवांना बाहेर आणू शकतील. यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे एल-सेरिन (L-serine) नावाचा अमिनो ॲसिड, जो माणसाच्या रक्तामध्ये विपुल प्रमाणात आढळतो. नासाच्या वैज्ञानिकांनी आढळलेले हे रसायन उल्कांमध्ये असलेल्या अमिनो ॲसिडशी मिळतंजुळतं आहे. हे जैविक प्रक्रियांसाठी आणि प्रथिनांचे संश्लेषण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.
advertisement
सूक्ष्मजीवांना आकर्षित करणारे हे रसायन!
पृथ्वीवरील कठीण परिस्थितीत टिकून राहणाऱ्या जीवजंतूंवर प्रयोग केल्यावर असं आढळलं की एल-सेरिन हे रसायन त्यांना आकर्षित करतं. यावरून वैज्ञानिकांनी एक यंत्र तयार केलं आहे, जे मंगळाच्या मातीवर हे रसायन सोडेल आणि तिथल्या सूक्ष्मजीवांना बाहेर खेचेल. यामुळे मंगळावर जीवसृष्टी असल्याचं सिद्ध करणं सोपं होईल.
advertisement
तिघा जीवजंतूंनी दिले यशस्वी परिणाम!
हा प्रयोग मॅक्स रिकेल्स, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन, जर्मनी येथील बायोसिग्नेचर संशोधक आणि माजी एरोस्पेस इंजिनिअर यांनी विकसित केला आहे. यामध्ये केमो-टॅक्सिस (Chemotaxis) नावाच्या प्रक्रियेचा वापर केला जातो, ज्यामध्ये सूक्ष्मजीव त्यांच्या आसपासच्या रसायनांना प्रतिसाद देतात. Frontiers in Astronomy and Space Sciences जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, पृथ्वीवरील तीन वेगवेगळ्या प्रकारच्या जीवजंतूंवर हा प्रयोग करण्यात आला आणि त्यांनी यशस्वी प्रतिसाद दिला.
advertisement
ही जीवसृष्टी मंगळावर कुठे सापडू शकते?
पृथ्वीवरील काही जीव अगदी प्रतिकूल परिस्थितीत जगू शकतात आणि मंगळाच्या पृष्ठभागाखाली असे जीव असण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर हे जीव विविध ठिकाणी आढळले आहेत...
advertisement
हे तिन्ही जीवजंतू एल-सेरिनच्या संपर्कात आल्यावर सक्रिय झाले. शास्त्रज्ञांच्या मते, मंगळावरील दक्षिणेकडील पर्वतीय भाग, वॅलिस मॅरिनेरिसच्या (Valles Marineris) खोल दऱ्या किंवा गुहा या भागांमध्ये तापमान पाण्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे तिथेही असेच जीव आणि सूक्ष्मजीव सापडण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांच्या या संशोधनामुळे मंगळावरच्या जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना एक नवी दिशा मिळाली आहे!
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 11, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/General Knowledge/
मंगळावर जीवसृष्टी आहे का नाही? शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी तयार केलं 'हे' नवं यंत्र, मानवी रक्तातील या घटकाचा केलाय वापर


