Independence Day 2025: एक नाही तर 365 दिवस होतं ध्वजारोहण! काय आहे सरकारी नियम
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभरातील प्रशासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालये आणि इतर खासगी ठिकाणी ध्वजारोहण केलं जातं. याशिवाय काही ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर देखील ध्वजारोहण करण्यात येतं.
छत्रपती संभाजीनगर : आज (15 ऑगस्ट 2025) आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशभरातील प्रशासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालये आणि इतर खासगी ठिकाणी ध्वजारोहण केलं जातं. याशिवाय काही ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर देखील ध्वजारोहण करण्यात येतं. पण, देशातील काही ठिकाणं अशी आहेत ज्याठिकाणी फक्त स्वातंत्र्यदिनीच नाही तर वर्षाचे 365 दिवस ध्वजारोहण केलं जातं.
आपल्यापैकी अनेकांना ही बाब माहिती नसेल की, देशातील शासकीय कार्यालयांमध्ये वर्षाचे 365 दिवस ध्वजारोहण केलं जातं. विशेष म्हणजे हे ध्वजारोहण अधिकाऱ्यांच्या हस्ते होत नाही. संबंधित कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा मान मिळतो. ऊन असो किंवा पाऊस नियमानुसार हे कर्मचारी दररोज ध्वजारोहण करतात. छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 12 ते 13 वर्षापासून उत्तम राम कुंभार, मुजीब खान पठाण, सय्यद अझरुद्दीन आणि प्रवीण नरवाडे हे चार कर्मचारी ध्वजारोहणाचं कार्य पार पाडत आहेत. या चार कर्मचाऱ्यांची 15 दिवसांची शिफ्ट असते.
advertisement
हे कर्मचारी सकाळी नेमून दिलेल्या वेळेत ध्वजारोहण करतात आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ध्वज खाली उतरवतात. लोकल18 च्या टीमने या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे कर्मचारी उत्तम राम कुंभार म्हणाले, "मी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून ध्वजारोहणाचं आणि ध्वज उतरवण्याचं काम करत आहे. हे काम करण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. मला माझ्या सेवा निवृत्तीपर्यंत हे काम करायला मिळालं तर मला खूप आनंद होईल."
advertisement
सय्यद असुद्दिन हे उत्तम कुंभार यांचे सहकारी आहेत. ते म्हणाले, "मीसुद्धा मागील 12 ते 13 वर्षांपासून हे काम करत आहे. आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांना अशी जबाबदारी मिळणे फार भाग्याचं काम आहे."
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 15, 2025 10:51 AM IST
मराठी बातम्या/General Knowledge/
Independence Day 2025: एक नाही तर 365 दिवस होतं ध्वजारोहण! काय आहे सरकारी नियम