कृत्रित पाऊस कसा पाडला जातो? कशी आहे त्यामागची वैज्ञानिक प्रक्रिया? किती खर्च येतो?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
दिवाळीनंतर दिल्ली व एनसीआर परिसरात प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. नैसर्गिक पावसाचा अभाव असल्यामुळे आता दिल्ली सरकार कृत्रिम पावसाचा पर्याय शोधत आहे. क्लाउड सीडिंग...
दिवाळीनंतर राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी खूप वाढते. त्यावेळी पाऊस जवळपास नसतोच. अशा स्थितीत प्रदूषणाशी सामना करणं हे मोठं आव्हान आहे. म्हणूनच, कृत्रिम पावसाच्या मदतीने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्लीत पहिल्यांदाच 'क्लाऊड सीडिंग'चा प्रयोग केला जाणार आहे.
दिल्ली सरकार मान्सून संपल्यानंतर 'क्लाऊड सीडिंग' म्हणजेच कृत्रिम पावसाची चाचणी करणार आहे. याआधी हा प्रयोग 4 ते 11 जुलैदरम्यान होणार होता, पण तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे हवेतील प्रदूषण कमी करणं. अमेरिका, चीन आणि संयुक्त अरब अमिरातीसारखे अनेक देशही याचा वापर करत आहेत.
काय आहे क्लाऊड सीडिंग?
'क्लाऊड सीडिंग' हे हवामान बदलण्याचं एक तंत्र आहे. यात वातावरणात 'सिल्व्हर आयोडाईड' (AgI) सोडलं जातं. यामुळे बर्फाचे कण तयार होतात आणि आकाशातील ढगांची पाऊस पाडण्याची क्षमता वाढते. कृत्रिम पावसासाठी बर्फाचे केंद्रक (ice nuclei) तयार होणं गरजेचं असतं, त्यात 'सिल्व्हर आयोडाईड' मदत करतं.
advertisement
या प्रक्रियेत विमान किंवा हेलिकॉप्टरमधून 'सिल्व्हर आयोडाईड', 'पोटॅशियम आयोडाईड' आणि 'ड्राय आईस' हवेत सोडले जातात. हे रसायन पाण्याचे कण आकर्षित करतात, ज्यामुळे पावसाचे ढग तयार व्हायला मदत होते. सहसा, या पद्धतीने पाऊस पडायला 30 मिनिटं लागतात. 'क्लाऊड सीडिंग' दोन प्रकारचं असतं – पहिलं 'हायग्रोस्कोपिक क्लाऊड सीडिंग' आणि दुसरं 'ग्लेसियोजेनिक क्लाऊड सीडिंग'.
advertisement
हायग्रोस्कोपिक आणि ग्लेसियोजेनिक क्लाऊड सीडिंगमधील फरक
'हायग्रोस्कोपिक' पद्धतीत, ढगांमधील पाण्याच्या थेंबांचं मीलन (coalescence) वेगाने होतं, ज्यामुळे मोठे थेंब तयार होतात आणि शेवटी पाऊस पडतो. यात सहसा ढगांच्या तळाशी मिठाचे कण सोडले जातात. दुसरं आहे 'ग्लेसियोजेनिक क्लाऊड सीडिंग'. यात 'सिल्व्हर आयोडाईड' किंवा 'ड्राय आईस'सारखे बर्फाचे केंद्रक (ice nuclei) पसरवून थंड ढगांमध्ये बर्फ तयार केला जातो. हे सर्व बर्फ तयार होण्यास आणि त्यानंतर पाऊस पडण्यास मदत करतात.
advertisement
याआधीही दिल्लीत 'क्लाऊड सीडिंग'चे नियोजन झाले होते, पण ते यशस्वी होऊ शकले नव्हते. यावेळी मात्र नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली आहे. यात आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी एक फॉर्म्युला तयार केला आहे, त्यामुळे चाचणीसाठी सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्रकल्पाला सुमारे 3.21 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर दिल्लीच्या आरोग्य आणि पर्यावरणासाठी ही एक मोठी उपलब्धी ठरू शकते.
advertisement
हे ही वाचा : हॉटेलच्या बेडवरची 'ती' रंगीत पट्टी कशासाठी असते? ही फक्त सजावट नाही, कारण ऐकून थक्क व्हाल!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 03, 2025 7:20 PM IST
मराठी बातम्या/General Knowledge/
कृत्रित पाऊस कसा पाडला जातो? कशी आहे त्यामागची वैज्ञानिक प्रक्रिया? किती खर्च येतो?


