Kalyan News: बिल्डराकडून बांधकाम सुरू असताना घर घेताय? कल्याणमध्ये महिलेसोबत घडलं भयंकर, 17 लाख गेले पाण्यात!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
आडिवली ढोकळीमध्ये एका गृह संकुलात घराची नोंदणी करून पाच वर्षे उलटली तरी या महिलेला घराचा ताबा नाहीच, पण सदनिकेसाठी घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून या महिलेने विकासकांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली.
घर खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी गावातील एका गृह संकुलात महिलेने घराची नोंदणी केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये घर बुक करूनही त्या महिलेला घराचा ताबा मिळाला नाही. महिलेने 17 लाख भरून घराची नोंदणी केली होती. नोंदणी करून पाच वर्षे उलटली तरी या महिलेला घराचा ताबा नाहीच, पण सदनिकेसाठी घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून या महिलेने विकासकांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली.
घर नोंदणी करणाऱ्या महिलेचं नाव, रश्मी ठुकरूल असं असून त्या नवी मुंबईतील तळोजा भागातील रहिवासी आहे. त्यांनी नोव्हेंबर 2020 साली कल्याण पूर्वेतील नांदिवलीतील आडिवली ढोकळी गावात एका गृहसंकुलात घराची नोंदणी केली होती. 17 लाख 80 हजार रुपये भरून महिलेने त्यांच्या घराची नोंदणी केली होती. घराची नोंदणी करून पाच वर्षे उलटले तरीही महिलेला घराचा ताबा नाहीच. शिवाय, सदनिकेसाठी घेतलेले पैसेही परत केले नाहीत म्हणून महिलेने विकासकाविरोधात फसवणूक केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली.
advertisement
नवी मुंबईत राहणाऱ्या रश्मी ठुकरूल या महिलेच्या तक्रारीवरून पोलीसांनी विकासकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. नोव्हेंबर 2020 ते डिसेंबर 2025 या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पैसे भरल्यानंतर विकासकाने सदनिकेचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत विविध कारणे देऊन सदनिकेचा ताबा विकासकाने दिला नाही. म्हणून सदनिकेसाठी भरणा केलेले पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला. ते पैसेही परत करण्यात आले नाहीत. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार केली.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 10, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News: बिल्डराकडून बांधकाम सुरू असताना घर घेताय? कल्याणमध्ये महिलेसोबत घडलं भयंकर, 17 लाख गेले पाण्यात!











