Badlapur: डोंबिवलीनंतर आता बदलापूरमध्येही बिबट्या, दोन बिबट्या पाहून नागरिक धास्तावले

Last Updated:

Badlapur Leopard News: गेल्या काही दिवसांपूर्वीच डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते. आता अशातच बदलापूरमध्येही बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे.

Badlapur: अंबरनाथनंतर आता बदलापूरमध्येही बिबट्या, दोन बिबट्या पाहून नागरिक धास्तावले
Badlapur: अंबरनाथनंतर आता बदलापूरमध्येही बिबट्या, दोन बिबट्या पाहून नागरिक धास्तावले
बदलापूर: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्या चांगलाच धुमाकूळ घालतोय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. गावाखेड्यामध्ये तर, बिबट्याची दहशत असताना आता शहरामध्येही बिबट्याचे दर्शन होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते. आता अशातच बदलापूरमध्येही बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या बदलापूरमध्ये दोन बिबट्यांची दहशत पसरली आहे.
बदलापूरच्या आंबेशिव गावाच्या हद्दीत एक नव्हे तर दोन- दोन बिबटे असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. बिबट्यानं भरदुपारीच कुत्र्याची शिकार केल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. बदलापूर नजीक असलेल्या आंबेशिव गावात बिबट्याची प्रचंड दहशत आहे. एका बिबट्यानं आज, शुक्रवारी (12 डिसेंबर) दुपारी दोनच्या सुमारास एका कुत्र्याची शिकार केल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला. तर इथे एक नव्हे दोन बिबटे असल्याचंही गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून आंबेशिव गावात स्थानिकांना बिबट्या दिसल्यामुळे इथले ग्रामस्थ दहशतीत जगत आहेत.
advertisement
गावकऱ्यांनी बिबट्या असल्याचा दावा केल्यानंतर याबाबतची माहिती वन विभागाला मिळाली. वन विभागाकडून या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा राबवण्यात आले. शिवाय, तातडीने पावले उचलून उपाययोजनाही सुरू केल्या होत्या. मात्र बिबट्याला पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आलेले नाही. बिबट्याने एका वस्तीजवळ कोंबड्यांवर हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. त्यानंतर आज रस्त्यावर रक्ताचा सडा दिसून आला. बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे आंबेशिव तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Badlapur: डोंबिवलीनंतर आता बदलापूरमध्येही बिबट्या, दोन बिबट्या पाहून नागरिक धास्तावले
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement