Kalyan News: सोनं हरवलं, चोरीला गेलं, कलर गेला, घाबरू नका! कल्याणच्या 'या' दुकानात एक ग्रॅम दागिन्यासाठी आहे खास ऑफर
- Reported by:
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
लग्नसराई असो अथवा कोणताही कार्यक्रम असो महिलांचा शृंगार हा सोन्यानेच पूर्ण होत असतो. शाई हार, राजवाडी गंठण, लाँग मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्र आदी वऱ्हायटी आपल्याला वन ग्रॅममध्ये बघायला मिळतात.
कल्याण: गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं दिसत असताना आज सोन्याने लाखाच्या पुढचा आकडा गाठला आहे. सामान्यांपासून कोणालाही परवडणार नाही एवढा सोन्याचा भाव असताना, महिलांमध्ये नाराजी बघायला मिळते. परंतु ही नाराजी वन ग्रॅमने नक्कीच भरून काढलीय. लग्नसराई असो अथवा कोणताही कार्यक्रम असो महिलांचा शृंगार हा सोन्यानेच पूर्ण होत असतो. शाई हार, राजवाडी गंठण, लाँग मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्र आदी वऱ्हायटी आपल्याला वन ग्रॅममध्ये बघायला मिळतात.
कल्याण डोंबिवलीमध्ये वन ग्रॅमचे शॉप बघायला मिळतात पण ऑफर मात्र बहुतांश ठिकाणी बघायला मिळत नाही. हिच ऑफर आपल्याला कल्याणमध्ये अनेक शॉपमध्ये बघायला मिळत आहे. त्यातीलच एक श्रद्धा जेम्स अँड ज्वेलरी मध्ये 3 हजाराच्या पुढे कोणतीही वस्तू खरेदी केली की त्यावर एक वस्तू फ्री आणि एक पैठणी बघायला मिळते. सेम सोन्यासारखे दिसणारे अनेक प्रकारचे दागिने या ठिकाणी बघायला मिळतात आणि आपल्याला हवे असलेले डिझाइन शायनिंग ही कमी भावात या ठिकाणी 31 डिसेंबरपर्यंत मिळत असल्याने अनेकांची गर्दी याठिकाणी दिसून येते.
advertisement
नवीन वर्षात सोन्याचा भाव आणखी वाढला तरी वन ग्रॅम खरेदी केल्याने कोणाला ही नाराजी राहणार नाही. त्यातच चोरी होण्याची किंवा पैसे गुंतवणूकीचा प्रश्नच नाही. अजून एक फायदा म्हणजे वस्तू खरेदी केल्यानंतर वापरुन झाल्यानंतर काही दिवसांनी आपण रिटर्न केली तर अर्ध्या किंमतीमध्ये आपण पुन्हा एक ग्रॅम ज्वेलर खरेदी करू शकतो. त्यामुळे वस्तू चोरली, हरवली किंवा कलर गेला तरी घाबरण्याची गरज नाही. म्हणून कोणाला वन ग्रॅम खरेदी करायचं असेल तर नक्कीच कल्याणमध्ये भेट द्या आणि आपल्याला हवे असलेली ज्वेलरी खरेदी करा. नवीन वर्ष नवीन मंगळसूत्र, ज्वेलरी खरेदी करण्यासाठी वन ग्रॅमची दुकाने पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये भरगच्च भरलेली बघायला मिळतात.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 7:23 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News: सोनं हरवलं, चोरीला गेलं, कलर गेला, घाबरू नका! कल्याणच्या 'या' दुकानात एक ग्रॅम दागिन्यासाठी आहे खास ऑफर








