Ambernath Leopard News: बिबट्या आला रे... डोंबिवलीनंतर आता अंबरनाथमध्येही दर्शन, प्रशासनाकडून शोध सुरू
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
डोंबिवलीनंतर अंबरनाथमध्येही मानवी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात मानवी वस्तीत बिबट्या आल्याने गावकरी घाबरलेल्या अवस्थेत आहेत. या बिबट्याने दोन शेळ्यांना खाऊन त्यांचा पडशा पडलाय.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचे दर्शन होत आहे. खासकरून ठाणे, पुणे, अहिल्या नगर, नाशिक जिल्ह्यासह सह्याद्रीच्या कडेला बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता अशातच शहरातही नागरिकांना बिबट्याचे दर्शन होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या हायप्रोफाईल परिसरामध्ये बिबट्या आढळून आला होता. आता त्यानंतर अंबरनाथ मध्येही बिबट्याचे दर्शन झाले आहे. मानवी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात मानवी वस्तीत बिबट्या आल्याने गावकरी घाबरलेल्या अवस्थेत आहेत .या बिबट्याने दोन शेळ्यांना खाऊन त्यांचा पडशा पडलाय.
अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव गावात मानवी वस्तीत बिबट्या आल्याने गावकरी घाबरलेल्या अवस्थेत आहेत .या बिबट्याने दोन शेळ्यांना खाऊन त्यांचा पडशा पडलाय. मानवी वस्तीत हा बिबट्या आल्याने गावकऱ्यांमध्ये मोठ्या दहशतीचं वातावरण आहे. सायंकाळच्या वेळेस घराबाहेर पडायला गावकरी भित आहेत. सध्या वनविभागाने या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे शिवाय ज्या ठिकाणी बिबट्याने शेळ्या खाल्ल्या आहेत. त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. जेणेकरून या बिबट्याच्या हालचाली कॅमेरात कैद होतील आणि त्याला पकडणे शक्य होईल. शिवाय, गावाकऱ्यांनी गावातल्या नागरिकांना टोळीने फिरण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, लहान मुलांना एकटं न पाठवण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपूर्वी, डोंबिवलीतील हाय प्रोफाईल लोढा खोणी पलावा बिल्डींगच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला होता. या परिसरामध्ये, इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आला होता. जेसीबीने काम करत असताना जेसीबी ड्रायव्हरला बिबट्या दिसला होता. ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर होता त्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावरच परिसरातील दोन मोठ्या शाळा होत्या. त्यामुळे पालकांसह, शाळा प्रशासन आणि स्थानिक शासनामध्येही भितीचे वातावरण पसरले होते. रहदारीच्या परिसरामध्ये आणि शहरामध्ये बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
advertisement
नागरी वस्तीमध्ये, बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागानंतर आता शहरातही बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. बिबट्या शिकारीच्या शोधात असल्यामुळे तो रहिवाशी वस्तीमध्ये आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोढा खोणी पलावा भागापासून मलंगगडचा जंगलपट्टा बराचसा लांब आहे. तरीही एवढ्या लांब बिबट्या शिकारी करता आल्याने नागरी वस्तीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 09, 2025 10:30 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Ambernath Leopard News: बिबट्या आला रे... डोंबिवलीनंतर आता अंबरनाथमध्येही दर्शन, प्रशासनाकडून शोध सुरू









