Kalyan News: कल्याणमध्ये मराठी महिलेला शिवीगाळ, भाव जास्त लावण्यावरून भांड्यांच्या दुकानातच तासभर तमाशा; खरेदीच्या वादावरून थेट रस्त्यावर राडा
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
कल्याण पूर्वेतील कोळसवाडी परिसरात भांडी खरेदीच्या मुद्द्यावरून दुकानदारात आणि ग्राहकांमध्ये जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. यामुळे दुकानामध्ये जोरदार गोंधळ निर्माण झाला होता.
राज्यात मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच कल्याण पूर्वेतील कोळसवाडी परिसरात भांडी खरेदीच्या मुद्द्यावरून दुकानदारात आणि शिवशाही प्रतिष्ठानच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. दुकानदाराने ग्राहकांना भांड्याची किंमत जास्तच महाग सांगितल्यामुळे ग्राहक आणि परप्रांतीय दुकानदारात जोरदार बाचाबाची झाली. ग्राहक दुकानातून बाहेर पडताच हा वाद वाढला आणि मोठा गोंधळ झाला. या घटनेत महिलांनी आक्रमक भूमिका घेत दुकानदाराला चांगलाच जाब विचारला आहे.
कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरामध्ये, अजय स्टील नावाच्या दुकानात शिवशाही प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिलांच्या एका कार्यक्रमासाठी लकी ड्रॉमध्ये देण्यासाठी भांडी खरेदीकरिता गेले होते. मात्र दुकानदाराने भांड्यांचे दर जास्त सांगितल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी इतर दुकानातून भांडी घेऊ असे सांगत दुकानाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याच गोष्टीचा राग आल्यामुळे दुकान मालक, त्याची पत्नी आणि मुलीने पदाधिकाऱ्यांना अपशब्द वापरत शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर संबंधित संघटनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना घटनास्थळी बोलावण्यात आले.
advertisement
महिलांकडून दुकानदारांच्या वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. परप्रांतीय दुकानदारांनी महिलांना पुढे करून मराठी नागरिकांशी गैरवर्तन करणे चुकीचे असल्याचा आरोप करत महिलांनी दुकानात जोरदार गोंधळ घातला. तब्बल एक ते दीड तास महिलांनी दुकानात ठिय्या देत दुकानदाराला जाब विचारला. अखेर परिसरातील स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाल्यानंतर वाद मिटवण्यात आला. या घटनेमुळे काही काळ कोळसवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सध्या परिस्थिती शांत असल्याची माहिती आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 5:26 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News: कल्याणमध्ये मराठी महिलेला शिवीगाळ, भाव जास्त लावण्यावरून भांड्यांच्या दुकानातच तासभर तमाशा; खरेदीच्या वादावरून थेट रस्त्यावर राडा









