Central Railway : रेल्वेचा एक तो निर्णय अन् बदलापूरकरांचं वाढलं टेन्शन, लोकल फेऱ्या....

Last Updated:

Badlapur Local Trains : बदलापूर-कर्जत मार्गावरील गर्दी वाढत असली तरी सध्या अतिरिक्त लोकल चालवणे शक्य नसल्याचे रेल्वेने सांगितले आहे. तिसरी-चौथी मार्गिका आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंग पूर्ण झाल्यावरच नवीन फेऱ्यांचा विचार होणार आहे.

Badlapur local trains
Badlapur local trains
कल्याण : मुंबई, ठाणे आणि कल्याण सह बदलापूर शहराचा विकास मोठ्या संख्येने होत आहे. दिवसेंदिवस या शहरातील लोकसंख्या वाढत आहे मात्र दररोज सकाळी बदलापूरवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना लोकलच्या भयानक गर्दीचा सामना करावा लागतो. यातच आता बदलापूर शहर वासियांचा त्रास आणखी वाढणार आहे.
बदलापूरवरुन मुंबईला नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. सकाळी 6 ते 10 या वेळेत बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड तुफान गर्दी होते. त्यामुळे या वेळेत आणखी लोकल फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र, रेल्वेने म्हात्रे यांच्या पत्राला उत्तर देताना सध्या अधिक लोकल चालवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
advertisement
3 नोव्हेंबरला दिलेल्या पत्राला रेल्वेने 28 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रत्युत्तरात काही महत्त्वाची कारणे नमूद केली आहेत. कल्याण- कर्जत मार्गावर रोज तब्बल 242 गाड्या धावत आहेत. यात लांब पल्याच्या गाड्या, उपनगरी लोकल सेवा आणि मालगाड्यांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला हा संपूर्ण मार्ग दिवसभर 100 टक्के क्षमतेने वापरला जात आहे. त्यामुळे सकाळी किंवा इतर कोणत्याही वेळेत अतिरिक्त लोकल सेवा चालवणे सध्या अशक्य असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.
advertisement
रेल्वे प्रशासनाच्या मते तिसरी-चौथी मार्गिका पूर्ण झाल्यावर आणि कल्याण स्टेशन यार्डचे रिमॉडेलिंग काम संपल्यानंतरच बदलापूर पट्ट्यात अधिक लोकल फेऱ्यांचा विचार करता येणार आहे. तोपर्यंत बदलापूरकरांना गर्दीतूनच प्रवास करावा लागणार आहे. सध्या 6 ते 10 दरम्यान एकूण 16 लोकल फेऱ्या बदलापूर ते सीएसएमटी चालतात. त्यापेक्षा जास्त फेऱ्या वाढवणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे रेल्वेच्या पत्रातून स्पष्ट झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Central Railway : रेल्वेचा एक तो निर्णय अन् बदलापूरकरांचं वाढलं टेन्शन, लोकल फेऱ्या....
Next Article
advertisement
Mahayuti : शिंदे गट–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे मोठ्या घडामोडी, महायुतीचा महापालिकेचा फॉर्म्युला ठरला
शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर
  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

View All
advertisement