Mumbai Local : कल्याण ते सीएसएमटी खास लोकल, प्रवाशांना होणार फायदा, पहिले फोटो आले समोर

Last Updated:

Mumbai Non Ac Local : CSMT ते कल्याण मार्गावर स्वयंचलित बंद दरवाजांची नॉन-एसी लोकल लवकरच चाचणीसाठी धावणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत होणारे अपघात कमी होऊन मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.

News18
News18
मुंबई : मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन हा रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो प्रवासी कामानिमित्त मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईदरम्यान लोकलने प्रवास करतात. मात्र पीक अव्हरमध्ये लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते. अनेक वेळा प्रवासी उघड्या दरवाज्यात लटकून प्रवास करताना दिसतात. त्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो आणि हा प्रवास अनेकदा जीवघेणाही ठरतो.
दररोजच्या प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय
या सर्वांचा विचार करता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वयंचलित बंद दरवाज्यांची नॉन-एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय आता प्रत्यक्षात येत आहे. अशा प्रकारची पहिली नॉन-एसी लोकल ट्रेन तयार झाली असून लवकरच तिच्या चाचणी फेऱ्या सुरू होणार आहेत.
मध्य रेल्वे मुंबईतील पहिली स्वयंचलित बंद दरवाज्यांची नॉन-एसी लोकल सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे उपनगरीय रेल्वे सेवेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मुंब्रा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्या घटनेमुळे गर्दीच्या वेळी उघड्या दरवाज्यांमुळे निर्माण होणारे धोके पुन्हा एकदा समोर आले होते.
advertisement
खास लोकलचे फोटो व्हायरल
या नवीन लोकल ट्रेनचे फोटो सर्वप्रथम एका 'एक्स'अर्थात(ट्विटर) युजरने शेअर केले. त्यानंतर प्रवाशांमध्ये या ट्रेनबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. फोटोंमध्ये बंद दरवाज्यांचे डबे स्पष्टपणे दिसत असून आतापर्यंत अशी सुविधा फक्त एसी लोकलमध्येच होती.
कल्याण ते सीएसएमटी खास लोकल सुरू होणार
ही लोकल ट्रेन सध्या तयार असून प्रवासी सेवेत दाखल करण्यापूर्वी तिच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्या CSMT ते कल्याण या अतिशय गर्दीच्या मार्गावर होण्याची शक्यता आहे. चाचणीदरम्यान दरवाज्यांची कार्यपद्धती, हवा खेळती राहण्याची व्यवस्था, प्रवाशांची हालचाल आणि गर्दीतील प्रवास यांचा अभ्यास केला जाणार आहे. या अनुभवावरून भविष्यात इतर मार्गांवरही अशा लोकल सुरू करायच्या का याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Mumbai Local : कल्याण ते सीएसएमटी खास लोकल, प्रवाशांना होणार फायदा, पहिले फोटो आले समोर
Next Article
advertisement
BJP vs Shiv Sena Ambernath : भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, अंबरनाथ नगर परिषदेत मोठी उलथापालथ, सगळा गेमच फिरला!
भाजपचा डाव फसला, शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक, गेमच फिरला अंबरनाथमध्ये उलथापाल
  • अंबरनाथ नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

  • शिवसेना शिंदे गटाची अंबरनाथमधून सत्ता उलथवण्यासाठी भाजपने जंग पछाडलं.

  • शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे भाजप पुरता घायाळ

View All
advertisement