Kalyan News : कल्याण हादरलं! नोकरीचं आमिष दाखवून विधवा महिलेसोबत घडला 'हा' धक्कादायक प्रकार

Last Updated:

Kalyan News : रेल्वेत सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका विधवा महिलेची 67 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक झाली. न्यायालयाच्या आदेशानंतर इगतपुरीतील चार आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.

News18
News18
कल्याण : रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका विधवा महिलेची आणि तिच्या कुटुंबाची तब्बल 67 लाख 23 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी आपण रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निकटवर्तीय असल्याचे भासवून पीडित कुटुंबाचा विश्वास संपादन केला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी इगतपुरी येथील एकाच कुटुंबातील चार जणांविरोधात फसवणुकीसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
शहाड येथे राहणाऱ्या विधवा महिला प्रेमलता धादवड यांची ओळख इगतपुरीतील दिशा उबाळे हिच्याशी झाली होती. दिशाने प्रेमलता यांच्या दोन्ही मुलांना(अजय आणि साहिल)यांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. अजय दिव्यांग असल्याने विशेष कोट्यातून त्याची नियुक्ती निश्चित असल्याचेही सांगण्यात आले. मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या आशेने प्रेमलता यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून बँकांकडून कर्ज घेतले.
advertisement
मार्च 2022 ते ऑगस्ट 2024 दरम्यान गुगल पे आणि विविध बँक खात्यांमार्फत आरोपींना एकूण ६७ लाख २३ हजार ३०० रुपये देण्यात आले. मात्र नियुक्ती पत्राची मागणी होताच आरोपी टाळाटाळ करू लागले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयात धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : कल्याण हादरलं! नोकरीचं आमिष दाखवून विधवा महिलेसोबत घडला 'हा' धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray : मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, बैठकांचा धडाका,  ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट
मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब
  • मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब

  • मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब

  • मातोश्री-शिवतीर्थावर हालचालींना वेग, ४८ तासात काय होणार? ठाकरे बंधूंच्या युतीबाब

View All
advertisement