Ulhasnagar : विश्वास नडला! शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीनेच व्यापाऱ्याचा केला गेम; पोलिसांत तक्रार दाखल
Last Updated:
Ulhasnagar News : उल्हासनगरमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष दाखवून किराणा व्यापाऱ्याची 22.95 लाखांची फसवणूक झाली. या प्रकरणी पती-पत्नींसह इतर आरोपींविरोधात हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर शहरात क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कॅम्प क्रमांक 5 येथील एसएसटी कॉलेज परिसरात राहणाऱ्या एका किराणा व्यापाऱ्याला जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवून तब्बल 22 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पती-पत्नींसह त्यांच्या इतर साथीदारांविरोधात हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाळ्यात कसे अडकले?
एसएसटी कॉलेजसमोर गोकुळनगर परिसरात प्रभावती संजय माळी राहतात. त्या किराणा दुकान चालवतात. त्याच परिसरात राहणारे मुकेश दत्तात्रय मोरे, अर्चना दत्तात्रय मोरे आणि त्यांच्या साथीदारांनी प्रभावती माळी तसेच सिद्धार्थ संजय चौधरी यांच्याशी संपर्क साधला. आरोपींनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दररोज पाच टक्के परतावा मिळेल, असे सांगून विश्वास संपादन केला.
नफ्याचं आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटलं
7 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत आरोपींनी वेळोवेळी पैसे गुंतवण्यास भाग पाडले. सुरुवातीला काही परतावा दिल्यानंतर मोठ्या रकमेची गुंतवणूक करून घेतली. मात्र नंतर पैसे परत न देता संपर्क टाळण्यात आला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रभावती माळी आणि सिद्धार्थ चौधरी यांनी हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
advertisement
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे मुकेश मोरे, अर्चना मोरे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा परताव्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 9:45 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Ulhasnagar : विश्वास नडला! शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीनेच व्यापाऱ्याचा केला गेम; पोलिसांत तक्रार दाखल









