गुगल मॅपने केला घात, अरुंद रस्त्यावर ट्रक झाला पलटी; चालक बचावला, पण नुकसान झालं जास्त!

Last Updated:

देवरुखजवळील संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस-जाकादेवी या अरुंद आणि अवघड मार्गावर गुगल मॅपच्या चुकीच्या माहितीमुळे गोवा येथून 'पार्लेजी पेपर रॅपर रोल' घेऊन जाणारा...

Ratnagiri truck accident
Ratnagiri truck accident
देवरुख (रत्नागिरी) : संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस-जाकादेवी या अरुंद आणि अवघड मार्गावर गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एक ट्रक रस्ता सोडून 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे, गुगल मॅपवर दाखवलेल्या 'जवळच्या' मार्गामुळे या ठिकाणी गेल्या काही दिवसांतील हा दुसरा अपघात आहे.
सुदैवाने चालक बचावला
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघातग्रस्त ट्रक (एमएच 48 सीबी 1930) गोवा येथून मुंबईतील वसईकडे सुमारे 7 टन 'पार्लेजी पेपर रॅपर रोल' घेऊन जात होता. ट्रकचालक तयन हुसेन खान याने गुगल मॅपवर मुंबईसाठी जवळचा मार्ग शोधला. मॅपने त्याला निवळी फाट्यावरून मुंबई-गोवा महामार्ग सोडून निवळी-जाकादेवी-फुणगूस असा अंतर्गत मार्ग दाखवला. हा मार्ग चढ-उतारांचा आणि अनेक अवघड वळणांचा आहे. याच अरुंद रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट खोलात कोसळला.
advertisement
प्रचंड नुकसान झाले
अपघाताचा मोठा आवाज होताच, पोलीस पाटील प्रशांत थूळ, रिक्षा व्यावसायिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखून गाडीच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस पाटील थूळ यांनी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
गुगल मॅपने केला विश्वासघात
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाट्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी गुगल मॅपचा आधार घेतल्यास अनेकदा राष्ट्रीय महामार्ग न दाखवता, निवळी-जाकादेवी-फुणगूस असा अंतर्गत मार्ग दाखवला जातो. हा मार्ग धोकादायक असून, यापूर्वीही गुगल मॅपच्या चुकीच्या माहितीमुळे या रस्त्यावर वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी अशा अंतर्गत आणि अरुंद रस्त्यांवरून जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कोकण/
गुगल मॅपने केला घात, अरुंद रस्त्यावर ट्रक झाला पलटी; चालक बचावला, पण नुकसान झालं जास्त!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement