'तो' बोलू लागला बहिणीशी, भावाला झालं नाही सहन, डोक्यात फोडली बाटली अन् चाकूने केला वार...

Last Updated:

गोकुळ शिरगावातील एमएसईबी कार्यालयासमोर बहिणीसोबत वारंवार बोलण्याच्या वादातून दोन तरुण चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झाले. बुधवारी दुपारी घडलेल्या या...

Gokul Shirgaon knife attack
Gokul Shirgaon knife attack
गोकुळ शिरगाव : बहिणीसोबत वारंवार बोलण्याच्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी गोकुळ शिरगावातील एमएसईबी कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी साहिल शिवाजी वाघमारे (वय-21, कागले माळ, गोकुळ शिरगाव) याने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
4 संशयित आरोपी, तर 2 गंभीर जखमी
या प्रकरणात सौरभ मोहन चोरडे (रा. कणेरी), आयुष चव्हाण (रा. कणेरीवाडी), सनी चव्हाण (रा. कणेरीवाडी) आणि एक अनोळखी मुलगा अशा चार संशयित आरोपींचा समावेश आहे. या हल्ल्यात वैभव तानाजी पाटील आणि सौरभ चोरडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
दोघांनी पकडले अन् एकाने चाकूने हल्ला केला
फिर्यादीनुसार, संशयित आरोपी सौरभ चोरडेने वैभव पाटील याला भेटण्यासाठी बोलावले होते. सौरभचा मित्र शिवानंद कणेरी येथे जात असताना, वैभव पाटीलने सौरभ चोरडेची माफी मागण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचवेळी सौरभ चोरडेने अचानक वैभवच्या कानशिलात मारून त्याच्या डोक्यात हातातील बिअरची बाटली फोडली, ज्यात वैभव गंभीर जखमी झाला. त्यानंतर सनी चव्हाण आणि एका अनोळखी मुलाने वैभवला पकडून ठेवले, तर आयुष चव्हाणने चाकूने त्याच्या हातावर वार करून त्याला जखमी केले.
advertisement
"नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही"
हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी साहिल वाघमारे आणि त्याचा मित्र शिवानंद तिथे गेले असता, अजित चव्हाण आणि सनी चव्हाण यांनी त्यांनाही मारहाण केली. "परत आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही," अशी धमकीही त्यांनी दिली. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मगदूम करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
'तो' बोलू लागला बहिणीशी, भावाला झालं नाही सहन, डोक्यात फोडली बाटली अन् चाकूने केला वार...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement