Raigad : प्रचारसभेत टीकेमुळे विरोधक चिडले, ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर हल्ला; गाडी फोडली
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
लोणेर वीर दरम्यान गाडीवर हल्ला केला गेला. यामध्ये सुदैवाने कोणाला दुखापत झालेली नाही. मात्र अनिल नवगुणे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.
प्रमोद पाटील, रायगड : शिवसेनेच्या शिंदे गटात आणि ठाकरे गटात राडा झाला असून यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. महाड इथं आयोजित केलेल्या प्रचार सभेनंतर हा राडा झाला. महाडमधील सभेत केलेल्या टीकेनंतर संतापलेल्या विरोधकांकडून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगुने यांच्या गाडीला टार्गेट करण्यात आलं.
याबाबत मिळालेली माहिती अशी, ठाकरे गटाची महाडमध्ये प्रचारसभा आयोजित केली होती. ही सभा संपल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगुने हे इंदापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी लोणेर वीर दरम्यान गाडीवर हल्ला केला गेला. यामध्ये सुदैवाने कोणाला दुखापत झालेली नाही. मात्र अनिल नवगुणे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.
शिवसाने ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला झाला. मुंबई- गोमा महामार्गावर टोमपाले ते वीर गावादरम्यान त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. यात कारचं नुकसान झालं असून चालक जखमी झाला असल्याची माहिती समोर आलीय. महाडमध्ये शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होती. या सभेसाठी अनिल नवगणे हे कार्यकर्त्यांसोबत गेले होते. तिथून ते इंदापूरला घरी कारने निघाले होते. वाटेत त्यांची कार अडवली आणि दगडफेक करत हल्ला केला. त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत कार पळवल्याने पुढील अनर्थ टळला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 03, 2024 8:30 AM IST
मराठी बातम्या/कोकण/
Raigad : प्रचारसभेत टीकेमुळे विरोधक चिडले, ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर हल्ला; गाडी फोडली


