Bhakti Mayekar हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला संपवणारा दुर्वास पाटील निघाला सिरीयल किलर! पोलिसांना धक्का!

Last Updated:

Ratnagiri Pregnant Girlfriend Murder Case : भक्ती मयेकर हत्या प्रकरणातील आरोपी दुर्वास पाटील याने आणखी दोन हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

Ratnagiri Pregnant Girlfriend Bhakti Mayekar Murder Case
Ratnagiri Pregnant Girlfriend Bhakti Mayekar Murder Case
Bhakti Mayekar Murder Case : रत्नागिरी जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या भक्ती मयेकर हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. भक्ती मयेकर प्रकरणाने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आरोपी दुर्वास पाटील याने आपली गरोदर गर्लफ्रेंडची हत्या केली होती. त्यावेळी तिच्या पोटातील बाळाचा देखील मृत्यू झाला होता. अशातच आता आरोपी दुर्वास पाटील याने आणखी दोन हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या पायाखालची जमीनच हादरली

पोलिसांनी भक्तीच्या खून प्रकरणाचा तपास केला असताना त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. दुर्वास पाटील याने आधीही दोन खून केल्याचं पोलस तपासात समोर आलं आहे. दुर्वास पाटील याने पहिला खून 50 वर्षाच्या सीताराम वीर यांचा केला होता. तर दुसरा खून 28 वर्षांच्या राकेश जंगम याचा खंडाळा येथे केला होता, अशी माहिती देखील समोर आली होती.
advertisement

दुर्वासने दिली गुन्हाची कबुली

दुर्वास पाटील अटक झाल्यानंतर देखील घाबरला नव्हता. तो सराईत गुन्हेगारासारखा वागत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर वाटद खंडाळा येथील एक बेपत्ता व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली होती. या प्रकरणात पत्ता तरुणाचाही दुर्वास यानेच खून केल्याचं समोर आलं. पोलिसांनी चंद्र दाखवताच दुर्वासने गुन्हाची कबुली दिली. दुर्वास पाटील याने पहिला खून 50 वर्षीय सीताराम वीर यांचा केला. ते दुर्वास पाटीलच्या वडिलांच्या नावे असलेल्या सायली बारमध्ये कामाला होते.
advertisement

दुर्वास पाटीलला पोलिसांनी अटक

दुर्वास पाटील याने मिरजोळे येथील भक्ती मयेकर या तरुणीबरोबर अनैतिक संबंध ठेवले. मात्र यात भक्ती अडथळा ठरत होती, त्यामुळे पाटीलने तिचा काटा काढला. भक्ती हिचा मृतदेह दोघा मित्रांच्या मदतीने आंबा घाटात नेवून दरीत फेकून दिला. भक्ती गायब झाल्याच्या तक्रारी नंतर 14 दिवसांनी तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दरीत आढळून आला. या प्रकरणात प्रमुख सूत्रधार असलेल्या दुर्वास पाटील याला पोलिसांनी अटक करुन चौकशी केली असता, त्याने भक्तीसह चार खून केल्याचे उघड झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/कोकण/
Bhakti Mayekar हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला संपवणारा दुर्वास पाटील निघाला सिरीयल किलर! पोलिसांना धक्का!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement