Malvan : चबुतरा तर ok आहे.., आरोपी चेतन पाटलाचा कोर्टात भलताच युक्तिवाद

Last Updated:

शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चेतन पाटीलला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. त्याला पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

News18
News18
सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चेतन पाटीलला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. त्याला पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. पोलिसांनी न्यायालयात चेतन पाटीलची कोठडी मागताना म्हटलं की, काम कसं केलं गेलं याचा पुरावा गोळा करायचा आहे. यात इतर कोणाचा हात होता का याची तपासणी करायची असल्याचंही कोर्टात सांगितलं.
सरकारी वकिलांनी म्हटलं की, पुतळा पडला असता तर एखाद्या पर्यटकाचा जीव गेला असता. बांधकाम कसे केले? पर्यावरणाचा अभ्यास केला काय़ या कामी माहिती घ्यायची आहे. तर आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध करताना म्हटलं की, आरोपी शिकलेला असून सगळ्या बाजू स्पष्ट झाल्या आहेत त्यामुळ पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. तसेच प्रत्यक्ष सहभाग नाही. जी घटना घडली त्यात अशिलचा प्रत्यक्ष सहभाग नाही.
advertisement
सरकारी वकील  म्हणाले की, आरोपी सोबत आणखी कोणाची आर्थिक देवाणघेवाण झाली की नाही? लॅपटॉप जप्त करायचं आहे. दोन आरोपी आहेत पैकी एक अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. दोन दिवसांत जे राडे झाले त्याची  चौकशी करायची आहे. त्यात आरोपीने काम कसे केले? याचा अहवाल हवा आहे. त्यासाठी दहा दिवस पोलीस कोठाडीची मागणी करण्यात येत आहे.
advertisement
चेतन पाटील याला झालेली अटक चुकीची असून पुतळा का पडला याचं कारण पोलिसांकडे नाहीय. ज्यामुळे घटना घडली त्यावर गुन्हा दाखल करणं योग्य होतं. त्यामुळे ही अटक चुकीची आहे. पुतळा का पडला याचा पोलिसांकडे कोणताच पुरावा नाहीय. खोट्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. चबुतरा ओके आहे. आरोपीनं चबुतरा बांधणे एवढेच काम केलं. तो नीट आहे असा अजब दावा आरोपीच्यावतीने वकिलांनी कोर्टात केला.
advertisement
तसंच आरोपीचे पुतळा पडावे असा हेतू नाही. 307 का दाखल केला? पुतळा का पडला याचे उत्तर शोधावे. यासाठी कुठल्या तज्ज्ञाचा अहवाल नाही. जनतेचा प्रक्षोभ कमी करण्यासाठी माझ्या अशिलावर गुन्हा दाखल केला गेला आहे. सर्व कागद pwd कडे आहेत. मूर्ती मधील धातू गंजले होते का? रिझन क्लियर नाही. आयपीसीमध्ये एक प्रकारे थट्टा केली आहे. सार्वजनिक मालमततेचे नुकसान कसे? गुन्ह्यात हे बसत का? नुकसान करणे हा आशिलाचा हेतू न्हवता, तर 20 ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाने लोकांकडून माहिती घेतली आणि फक्त मेल केला गेला. एफआयआर अशी केली आहे की ती बोगस आहे त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची नसल्याचं चेतन पाटीलच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं.
advertisement
दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी शिल्पकार आपटे फरार आहे. तो फरार असल्यानं या प्रकरणात त्याचा शोध घेतला आहे. तपासाची माहिती मिळवण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
view comments
मराठी बातम्या/कोकण/
Malvan : चबुतरा तर ok आहे.., आरोपी चेतन पाटलाचा कोर्टात भलताच युक्तिवाद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement