HSRP साठी शेवटचे 72 तास शिल्लक! रत्नागिरीत 42 टक्के वाहनांवर कारवाईची टांगती तलवार

Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या २ लाख ११ हजार वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याची अंतिम मुदत...

Ratnagiri News
Ratnagiri News
रत्नागिरी : महाराष्ट्र सरकारने वाहनांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिल 2029 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी दिलेली अंतिम मुदत 15 ऑगस्ट जवळ आली आहे. त्यामुळे ही नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
HSRP बसवण्याची प्रक्रिया सुरू
यापूर्वी सरकारने एचएसआरपी बसवण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदत दिली होती. मात्र, त्यावेळी जिल्ह्यात केवळ 3 ‘फिटमेंट सेंटर्स’ (नंबरप्लेट बसवण्याची केंद्रे) होती, ज्यामुळे सर्व वाहनांना नंबरप्लेट बसवणे शक्य नव्हते. यामुळे सरकारने ही मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवली आणि सेंटर्सची संख्या 27 पर्यंत वाढवली.
जिल्ह्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेली, पण एचएसआरपी नसलेली एकूण 2 लाख 11 हजार 423 वाहने आहेत. यापैकी 7 जुलैपर्यंत 1 लाख 22 हजार 737 वाहनांनी (58 टक्के) नंबरप्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 96 हजार 285 वाहनांना (46 टक्के) ही नंबरप्लेट बसवण्यात आली आहे.
advertisement
कारवाई होणार की मुदत वाढणार?
परिवहन विभागाने सांगितले की, एचएसआरपीसाठी 15 ऑगस्टची अंतिम मुदत दिली आहे. यानंतरही ज्या वाहनांना ही नंबरप्लेट बसवलेली नसेल, त्यांच्यावर 'वायुवेग पथकामार्फत' कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आता 15 ऑगस्टनंतर खरोखरच कारवाई होणार की पुन्हा एकदा मुदत वाढणार, याकडे सर्व वाहनधारकांचे लक्ष लागून राहिले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कोकण/
HSRP साठी शेवटचे 72 तास शिल्लक! रत्नागिरीत 42 टक्के वाहनांवर कारवाईची टांगती तलवार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement