आवळा एक फायदे पाच, वजन कमी करण्याचं स्वप्नही होईल पूर्ण!
- Published by:News18 Digital
- trending desk
Last Updated:
आवळा हे एक पौष्टिक रत्न आहे, कारण त्यातकॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. यातीलव्हिटॅमिन सी एकाग्रता, निरोगी त्वचा, उत्तमरोगप्रतिकारकशक्तीसाठी उपयुक्त आहे.
मुंबई, 26 सप्टेंबर : चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळाअनेकांना आवडतो. आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. त्यामुळे प्रत्येकानं आवळ्याचंसेवन केलं पाहिजे. आरोग्याच्यादृष्टीनं आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. याबहुगुणी आवळ्याचं नियमित सेवन केल्यानं वजन कमी होण्यासदेखील मदत होते.
आवळा हे एक पौष्टिक रत्न आहे, कारण त्यातकॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. यातीलव्हिटॅमिन सी एकाग्रता, निरोगी त्वचा, उत्तमरोगप्रतिकारकशक्तीसाठी उपयुक्त आहे. आवळा हा कच्चा खाता येतोच, शिवाय आवळ्याचा रस, पावडर देखील मिळते.
आवळा फळ आरोग्य, त्वचा आणि केसांच्या असंख्य फायद्यांसाठी ओळखलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का, आवळा ज्यूस वजन कमी करण्यासाठीआणि जलद चरबी जाळण्यासाठी सर्वोत्तम भारतीय रसांपैकी एक म्हणून ओळखले जाते? आवळ्यात अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात असल्यानं हे फळअनेक आरोग्य फायदे देते. आवळ्याच्या नियमित सेवनानं चयापचय वाढते, चरबी कमी होते. पचनक्रिया नियंत्रित राहून वजन कमी करण्यास देखील मदतमिळते. चला तर, आवळा वजन कमी करण्यास कसा उपयुक्त आहे,ते पाहू.
advertisement
चयापचय क्रिया उत्तेजित होते
आवळा तुमची चयापचय क्रिया उत्तेजित करण्यास मदत करते. तुमचे शरीरतुम्ही खात असलेले अन्न हे द्रव उर्जेमध्ये बदलते. तुमचे चयापचय जितके जलद होईल,तितक्या लवकर तुम्ही तुमच्या सर्व कॅलरी बर्न करीत असता.
अँटिक्सॉइडंट समृद्ध फळ
आवळ्याच्या रसातील मुबलक अँटिऑक्सिडंट व त्याची शरीरातील विषारीपदार्थ काढून टाकण्याची क्षमता, हे वजन कमी करण्यासाठीउपयुक्त ठरतात. याव्यतिरिक्त, आवळ्यामुळे लवकर भूक लागतनाही. त्यामुळे अन्नाचं सेवन करण्यावर अधिक नियंत्रण ठेवता येतं.
advertisement
पचनसंस्था बळकट होते
आवळ्याचे अल्कधर्मी गुणधर्म शरीराची स्वच्छता आणि पचनसंस्था बळकटकरण्यात मदत करतात. आवळ्याचा रस पचन सुधारण्यासाठी उत्तम आहे. कारण त्यात फायबरचेप्रमाण जास्त असते.
मधुमेह नियंत्रण
आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचं तत्व असते, जेरक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करते. आवळ्याचा रस पिण्यानं रक्तातील साखरेचीसामान्य पातळी राखण्यात तसेच मधुमेह आणि त्यासोबत वाढणाऱ्या वजनावर नियंत्रणठेवण्यास मदत करते.
advertisement
फायबरचा स्रोत
आवळ्याचा रस फायबरचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यामुळेतुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. साहजिकच, यामुळेतुमचे खाण्यावर नियंत्रण राहू शकते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
दरम्यान, वजन कमी करण्यासाठी आवळ्याचा आहारातसमावेश करणे खूपच फायदेशीर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 26, 2023 4:46 PM IST