Covishield मुळे आधीच टेन्शन आलेलं असताना, आता आणखी एका कंपनीने माघारी बोलावली कोविड लस
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपल्या कोविड प्रतिबंधक लशीमुळे रक्त गोठण्याशी संबंधित दुर्मिळ वैद्यकीय स्थिती उद्भवू शकते, असं कबूल केलं होतं.
मुंबई : यूकेतल्या अॅस्ट्राझेनेका कंपनीने कोविड महामारीच्या काळात लस तयार केली होती. जगभरातल्या अनेक देशांमध्ये ही कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. आता या कंपनीने कोर्टात कबूल केलं आहे की, या कोविड प्रतिबंधक लशीमुळे रक्त गोठण्याशी संबंधित दुर्मिळ वैद्यकीय स्थिती उद्भवू शकते. ब्रिटिश माध्यमांनी 29 एप्रिल रोजी याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं होतं. तेव्हापासून जगभरात गोंधळ उडाला आहे. कंपनीवर जगभरातून टीका होत आहे. त्यानंतर ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी असलेल्या अॅस्ट्राझेनेकाने जगभरात कोविड-19 प्रतिबंधक लशीची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
विक्री आणि वापर थांबवण्यात आलेल्या लशींमध्ये भारतात बनवलेल्या कोविशील्ड लशीचाही समावेश आहे. अॅस्ट्राझेनेकाची लस भारतात कोविशील्ड या नावाने वापरली जात होती. लस माघारी बोलावण्याबाबत कंपनीने वेगळंच कारण दिलं आहे. अॅस्ट्राझेनेकाने दिलेल्या माहितीनुसार, बाजारातून लस मागे घेण्यासाठी 5 मार्च रोजी अर्ज करण्यात आला होता. त्याला 7 मे रोजी परवानगी मिळाली.
अॅस्ट्राझेनेकाने 2020 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली होती. हे सूत्र वापरून, भारतात सिरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड नावाची लस तयार करते. अॅस्ट्राझेनेकाने मंगळवारी सांगितलं होतं, की मार्केटमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त लस उपलब्ध आहे. त्यामुळे कंपनीने मार्केटमधून सर्व लशी माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपल्या कोविड प्रतिबंधक लशीमुळे रक्त गोठण्याशी संबंधित दुर्मिळ वैद्यकीय स्थिती उद्भवू शकते, असं कबूल केलं होतं. लशीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्याच्या दाव्यामुळे सुरू झालेल्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान कंपनीने ही कबुली दिली आहे. या फार्मास्युटिकल जायंट कंपनीच्या लशीमुळे आपलं नुकसान झाल्याचा आरोप ब्रिटनमधल्या काही कुटुंबांनी केला आहे. त्यांनी कंपनीविरोधात एकत्रितपणे क्लास अॅक्शन लॉ-सूट दाखल केला आहे.
advertisement
कोविड महामारीच्या काळात, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाने लशीची निर्मिती केली होती. त्या वेळी ब्रिटनमध्ये झालेल्या एका प्राथमिक अभ्यासात असं आढळलं होतं की, ही लस घेऊन सहा महिने उलटल्यानंतर नागरिकांना ओमिक्रॉन संसर्गापासून संरक्षण मिळत नाही. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत कोविशील्ड लशीचे 220 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आफ्रिका खंडातल्या अनेक देशांमध्ये या लशीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला होता. कंपनीने इतर अनेक देशांमध्ये ही लस वितरित केली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 08, 2024 10:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Covishield मुळे आधीच टेन्शन आलेलं असताना, आता आणखी एका कंपनीने माघारी बोलावली कोविड लस