advertisement

Piles Treatment : मूळव्याधासाठी घरगुती आयुर्वेदिक उपचार; याची कारणे, लक्षणं ही माहित असायला हवीत

Last Updated:

पाइल्स हा एक सर्वसामान्य आजार आहे जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेला कोंब. मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात.

+
ह्या

ह्या करणांन मुळे होतो मूळव्याध.

कुणाल दंडगव्हाळ -प्रतिनिधी, नाशिक : पाइल्स हा एक सर्वसामान्य आजार आहे, जो कोणालाही होऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेत मूळव्याध असेही म्हणतात. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळ असलेला कोंब. मूळव्याध हे दोन प्रकारचे असतात. पहिला आतील मूळव्याध जो गुदाशयाच्या आतमध्ये विकसित होतो आणि दुसरा बाहेरील मूळव्याध जो बाहेर म्हणजे गुदाशयाच्या भोवतीच्या त्वचेखाली विकसित होतो.
नाशिक येथील निसर्गउपचार तज्ञ मिलिंद पोटे यांनी लोकल 18 शी बोलताना या आजाराचं निदान आणि उपचार यांबद्दल सांगितलं आहे.
मुळव्याधाचे मुख्य लक्षणं
शौचानंतर रक्तस्त्राव – हे रक्त लाल रंगाचे असते.
गुदद्वाराजवळ खाज येणे किंवा गुदद्वाराजवळ कोंब बाहेर येणे, हा कोंब शौचानंतर हाताने आत ढकलावा लागू शकतो.
advertisement
मूळव्याध नक्की कशामुळे होतो हे सांगणे कठीण असते. गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांमधील दाब वाढला की हा त्रास होतो. बहुतेक वेळा मूळव्याधीचा त्रास शौचाला कायम जोर लावून करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे होतो.
आहारात पदार्थांची कमतरता असल्यामुळे देखील हा आजार होतो आणि त्यामुळे शौचाच्या वेळी जोर करावा लागतो.
advertisement
मूळव्याध होण्याची कारणे:
शौचाच्या वेळी कायम जोर लावणे.
आहारात फायबरची कमतरता.
मसालेदार आहार.
तळलेले किंवा वातूळ पदार्थ जास्त खाणे.
वेळेवर जेवण न करणे.
मूळव्याधावरील आयुर्वेदिक उपचार:
निसर्गोपचारतज्ज्ञ मिलिंद पोटे यांनी मुळव्याधावर उपचार सांगितले आहेत, जे फायद्याचे ठरु शकतात.
कडुलिंबाचा पाला: रोज मूठभर चावून खाल्ल्यास मूळव्याध कमी होतो.
हिरडा पावडर: रोज उपाशीपोटी घेणे.
advertisement
ताकचित्रकाचा प्रयोग: चित्रक पावडर (10-20 ग्रॅम) एका कप पाण्यात मिसळून लेप तयार करावा. लेप मातीच्या माठात सुकवून त्यात 200 मि.ली. दूध घालावे.
हे माठ एका दिवसासाठी बंद ठेवावे, जेणेकरून दूध दही होईल.
तयार ताक रोज उपाशीपोटी घोट-घोट प्यावे.
या उपायांमुळे मूळव्याधीचा त्रास कमी होऊ शकतो, असे मिलिंद पोटे यांनी सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Piles Treatment : मूळव्याधासाठी घरगुती आयुर्वेदिक उपचार; याची कारणे, लक्षणं ही माहित असायला हवीत
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement