संकटापलीकडचं सौंदर्य! पाकिस्तानमधील या ७ ठिकाणांनी जगाला लावलं वेड, जिथे आहे निसर्गाचा अद्भुत चमत्कार!

Last Updated:

पाकिस्तानचं नाव घेतलं की, आजकाल आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे दहशतवाद आणि आर्थिक संकटाचं चित्र. याच सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक पर्यटक पाकिस्तानला भेट देणं टाळतात. पण...

Pakistan Tourism
Pakistan Tourism
पाकिस्तानचं नाव घेतलं की, आजकाल आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे दहशतवाद आणि आर्थिक संकटाचं चित्र. याच सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक पर्यटक पाकिस्तानला भेट देणं टाळतात. पण, या सगळ्या नकारात्मक बातम्यांच्या पलीकडे, पाकिस्तानमध्ये असं काहीतरी आहे, जे दरवर्षी जगभरातील हजारो विदेशी पर्यटकांना अक्षरशः खेचून आणतं.
ते कारण म्हणजे, तिथलं अद्भुत नैसर्गिक सौंदर्य, आकाशाला स्पर्श करणारे उंच डोंगर आणि मनाला थंडावा देणारं शांत वातावरण. पर्यटक या समस्यांकडे दुर्लक्ष करून निसर्गाच्या या वरदानाचा अनुभव घेण्यासाठी तिथे पोहोचतात. चला, आज आपण पाकिस्तानमधील अशाच ७ ठिकाणांची ओळख करून घेऊया, ज्यांच्या प्रेमात परदेशी पर्यटक आकंठ बुडाले आहेत.
विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारी पाकिस्तानमधील ७ ठिकाणे:
advertisement
१. हुंझा व्हॅली (The Hunza Valley): गिलगिट-बाल्टिस्तानमधील 'हुंझा व्हॅली' हे नाव घेतलं तरी डोळ्यांसमोर एक जादुई चित्र उभं राहतं. जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक मानली जाणारी ही दरी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच आहे. चारही बाजूंनी अजस्त्र डोंगर, खाली पसरलेली हिरवीगार शेतं आणि साथीला स्फटिकासारखी स्वच्छ सरोवरे व खळाळणारे धबधबे... हे दृश्य खरोखरच स्वर्गासारखं वाटतं.
advertisement
२. स्कार्दू (Skardu): जर तुम्हाला साहसाची आवड असेल, तर स्कार्दू हे तुमच्यासाठीच आहे. या जागेला 'पाकिस्तानचं स्वित्झर्लंड' म्हटलं जातं ते उगीच नाही! ट्रेकिंग (Trekking) आणि साहसप्रेमींसाठी (Adventure Lovers) हे ठिकाण म्हणजे एक नंदनवनच आहे, जिथे दरवर्षी हजारो पर्यटक आव्हानं पेलायला येतात.
३. फेअरी मीडोज (Fairy Meadows): कल्पना करा, तुम्ही जगातल्या सर्वात खतरनाक मानल्या जाणाऱ्या 'नंगा परबत'च्या पायथ्याशी बसला आहात! 'फेअरी मीडोज' (म्हणजेच 'पऱ्यांचं कुरण') हे असंच एक स्वप्नवत ठिकाण आहे. ट्रेकिंग आणि कॅम्पिंगसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या जागेवरून नंगा परबतचं जे दृश्य दिसतं, ते पाहून परदेशी पर्यटक या जागेला 'स्वर्ग' का म्हणतात, हे लगेच कळून चुकतं.
advertisement
४. स्वात व्हॅली (Swat Valley): 'स्वात व्हॅली' म्हणजे जणू निसर्गाने रंगवलेला एखादा सुंदर कॅनव्हास. इथले खळाळणारे धबधबे, शांत सरोवरे आणि दाट हिरवीगार जंगलं पर्यटकांचं मन मोहून टाकतात. विशेषतः इथली 'कलाम व्हॅली' आणि सुंदर रिसॉर्ट्स पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
५. नीलम व्हॅली (Neelam Valley): पाकव्याप्त काश्मीरमध्ये वसलेली 'नीलम व्हॅली' (Neelam Valley) खरोखरच 'पृथ्वीवरील स्वर्ग' म्हणून ओळखली जाते. आकाशाला स्पर्श करणारे गगनचुंबी डोंगर, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली हिरवीगार कुरणं आणि उंचच उंच पाईन वृक्षांच्या रांगा, या दरीला एक वेगळीच ओळख मिळवून देतात.
advertisement
६. कराचीचा क्लिफ्टन बीच (Karachi's Clifton Beach): फक्त डोंगरच नाही, तर पाकिस्तानचा समुद्रकिनाराही पर्यटकांना आकर्षित करतो. कराचीचा 'क्लिफ्टन बीच' हा तिथल्या सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. इथला सूर्यास्त (Sunsets) पाहण्याचा अनुभव इतका अप्रतिम असतो की, केवळ त्यासाठी दरवर्षी अनेक विदेशी पर्यटक इथे गर्दी करतात.
७. लाहोरची बादशाही मशीद आणि शालीमार गार्डन्स: निसर्गासोबतच पाकिस्तानचा ऐतिहासिक वारसाही पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. लाहोर शहरातील भव्य 'बादशाही मशीद' (Badshahi Mosque) आणि 'शालीमार गार्डन्स' (Shalimar Gardens) पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून येतात. बादशाही मशिदीची भव्यता आणि सुंदर मुघल वास्तुकला (Mughal Architecture) जगभरात प्रसिद्ध आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
संकटापलीकडचं सौंदर्य! पाकिस्तानमधील या ७ ठिकाणांनी जगाला लावलं वेड, जिथे आहे निसर्गाचा अद्भुत चमत्कार!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement