Detox Water : बरेच सेलिब्रिटी पितात डिटॉक्स वॉटर, तुम्ही घरीही बनवू शकता, एक ना दोन अनेक फायदे
- Published by:Priya Lad
Last Updated:
Detox Water : डिटॉक्स वॉटर तुमच्यासाठी अनेक समस्या कमी करण्यास खूप उपयुक्त ठरू शकते. नाव जरी अवघड वाटत असलं तरी हे खास पाणी तुम्ही घरीही बनवू शकता.
नवी दिल्ली : साधं पाणी तर सगळेच पितात पण पाण्याचा एक प्रकार डिटॉक्स वॉटर... किती तरी सेलिब्रिटी हे डिटॉक्स वॉटर पितात. नाव जरी अवघड वाटत असलं तरी हे खास पाणी तुम्ही घरीही बनवू शकता. आता हे डिटॉक्स वॉटर म्हणजे काय, त्याचे फायदे काय आणि ते घरीच कसं बनवायचं ते पाहुयात.
आजच्या जीवनशैलीत, स्वतःसाठी वेळ काढणे प्रत्येकासाठी सोपं काम नाही. धावपळीच्या जीवनात गुंतलेल्या लोकांना वजन कमी करण्यासाठी आणि सर्व प्रकारचे आरोग्य फायदे मिळविण्यासाठी तासनतास कठोर परिश्रम करावे लागतात. अशा परिस्थितीत डिटॉक्स वॉटर तुमच्यासाठी अनेक समस्या कमी करण्यास खूप उपयुक्त ठरू शकते.
डिटॉक्स वॉटर म्हणजे काय?
हेल्थलाइनच्या मते, डिटॉक्स वॉटर हे खरं तर फळे, हिरव्या भाज्या आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींपासून बनवलेलं एक विशेष पेय आहे. याला फळांच्या चवीचं पाणी असंही म्हणता येईल. कोणत्याही ज्यूसच्या तुलनेत त्यात कॅलरीजचं प्रमाण खूप कमी असतं.
advertisement
डिटॉक्स वॉटरचे फायदे
डिटॉक्स वॉटर केवळ आपल्या शरीराला हायड्रेट करत नाही तर ते शरीरातील वाढत्या विषारी पदार्थांना कमी करण्यास देखील मदत करते. ते किडनी आणि यकृत स्वच्छ करण्यास आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतं. शरीराच्या आत डिटॉक्सची प्रक्रिया सुरू होताच, त्याचा परिणाम शरीराच्या अनेक भागांवर दिसू लागतो. उदाहरणार्थ, त्वचा निरोगी दिसू लागते, पचनसंस्था योग्यरित्या काम करू लागते आणि वजन देखील वेगाने कमी होताना दिसते.
advertisement
घरी असे डिटॉक्स वॉटर बनवा
तुम्ही ते घरी सहज बनवू शकता. यासाठी ताजी फळे, भाज्या आणि औषधी वनस्पतींसह फक्त पिण्याचं पाणी आवश्यक आहे. वेगवेगळ्या चवीचे डिटॉक्स वॉटर कसं बनवता येईल ते पाहुयात.
काकडीचं डिटॉक्स वॉटर
काकडीचे काही तुकडे कापून ते अर्धा लीटर थंड किंवा सामान्य तापमानाच्या पाण्यात टाका. तुमच्या आवडीनुसार काळं मीठ, लिंबाचे तुकडे किंवा लिंबाचा रस घाला. त्यात 6-7 पुदिन्याची पानं टाकून तुम्ही त्याची चव आणखी वाढवू शकता. 4 तास फ्रीजमध्ये ठेवा. 4 तासांनी ते बाहेर काढा. तुम्ही ते दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभरही पिऊ शकता.
advertisement
सफरचंद दालचिनी डिटॉक्स वॉटर
कापलेल्या सफरचंदाचे काही तुकडे आणि काही दालचिनीचे तुकडे अर्धा लीटर पाण्यात मिसळा. चवीसाठी लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला आणि फ्रिजमध्ये 4 तास ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. त्याचं सतत सेवन केल्याने अनेक आजार दूर राहतात. सफरचंद डिटॉक्स वॉटर म्हणून प्यायल्याने किडनीतील घाण देखील साफ होते आणि किडनीचं कार्य देखील निरोगी राहते. दालचिनी घातल्याने ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील सक्षम होतं.
advertisement
संत्री आणि आल्याचं डिटॉक्स वॉटर
संत्र्याचे लहान तुकडे करा आणि आल्याचा एक छोटा तुकडा किसून घ्या अर्धा लीटर पाण्यात संत्री आणि आल्याच्या फोडी टाका. चवीसाठी तुम्ही त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब घालू शकता. 3 ते 4 तास फ्रिजमध्ये ठेवा आणि दररोज सेवन करा. यामुळे वजन कमी होईल आणि त्वचा चांगली होईल.
advertisement
कशाकशाचं डिटॉक्स वॉटर होतं?
या व्यतिरिक्त तुम्ही काकडी-पुदिना, लिंबू-आले, काळी बेरी-संत्री, खरबूज-पुदिना, द्राक्ष-रोझमेरी, संत्री-लिंबू, स्ट्रॉबेरी-तुळस यांचं मिश्रण करून डिटॉक्स वॉटर बनवू शकता आणि पिऊ शकता. हे तुमच्यासाठी चव आणि आरोग्य दोन्ही बाबतीत चांगले ठरेल.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
view commentsLocation :
Delhi
First Published :
July 25, 2025 2:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Detox Water : बरेच सेलिब्रिटी पितात डिटॉक्स वॉटर, तुम्ही घरीही बनवू शकता, एक ना दोन अनेक फायदे


