Benefits of Black pepper: सर्दी खोकल्यापासून ते मेंदूच्या आजारांवर गुणकारी आहेत ‘हे’ काळे दाणे, स्वयंपाकघरातला ‘हा’ मसाला ठरू शकतो औषधांना उत्तम पर्याय
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Black paper: ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ ही म्हण आपल्याला माहिती आहे. किचनमधल्या एका मसाल्याला ही म्हण पूर्णपणे लागू शकते. या मसाल्याचं नाव आहे ‘काळी मिरी’. काळी मिरी ही आरोग्यासाठी एक वरदान आहे म्हणूनच काळ्या मिरीचा उल्लेख ‘मसाल्यांची राणी’ असा सुद्धा केला जातो.
मुंबई: भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्णब्रह्म म्हटलं जातं. कारण आपल्या जेवणाच्या थाळीमध्ये जे सगळे पदार्थ असतात त्या प्रत्येक पदार्थांचा शरीराला काही ना काही फायदा हा होत असतो. विचार करा डाळी भाज्यांचे इतके फायदे असतील तर ज्या मसाल्यांच्या मदतीने हे जेवण बनवलं जातं ते मसाले किती शक्तीशाली आणि आरोग्यदायी असू शकतात. मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण आपल्याला माहिती आहे. किचनमधल्या एका मसाल्याला ही म्हण पूर्णपणे लागू शकते. या मसाल्याचं नाव आहे ‘काळी मिरी’. काळी मिरी ही आरोग्यासाठी एक वरदान आहे म्हणूनच काळ्या मिरीचा उल्लेख ‘मसाल्यांची राणी’ असा सुद्धा केला जातो.
किचन मधल्या प्रत्येक मसाल्याचे काही ना काही औषधी गुणधर्म आहेत. योग्य प्रमाणात या मसाल्यांचं सेवन केलं तर कदाचीत आजारी पडण्याची आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार नाही. काळी मिरी सुद्धा असाच एक मसाला आहे. काळी मिरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. याशिवाय आतड्यांच्या आरोग्यासाठीही काळी मिरी फायद्याची ठरते.
advertisement
एका अहवालानुसार, काळ्या मिरीत पिपेरिन नावाचं एक घटक असतं जे शरीरातील पोषकतत्त्वांचं शोषण वाढवतं.यामुळे खालेल्या अन्नपदार्थातून शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं आणि इतर पोषकतत्वं मिळण्याचं प्रमाण वाढतं. पिपेरिनचे गुणधर्म मेटाबॉलीझम वाढून शरीरातली अतिरिक्त चरबी जळायला मदत करतात. काळी मिरी पचनासही हातभार लावते काळी मिरी खाल्ल्याने गॅसेस, ब्लोटिंग आणि अपचना यासारख्या समस्यांचा त्रास कमी होतो. काळी मिरी पाचक एंझाइम्स वाढवायला मदत करते, ज्यामुळे अन्न पचायला मदत होते. काळ्या मिरीच्या पावडरला गरम पाण्यात उकळून तुम्ही ती काढा किंवा ब्लॅक पेपर टी म्हणून पिऊ शकता.
advertisement
काळ्या मिरीत असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे सर्दी आणि खोकल्या सारख्या आजारापासून बचाव होतो. काळी मिरीचे सेवन केल्याने शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो. काळ्या मिरीत दाहक-विरोधी गुणधर्मांनी आहेत, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी व्हायला मदत होते. हिवाळ्यात संधीवात किंवा सांधेदुखीचा त्रास वाढतो अशावेळी काळ्या मिरीचे 3-4 दाणे खाल्ल्यास वेदना कमी होतात.
advertisement

काळ्या मिरीतल्या पिपेरिनमुळे मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढून मेंदूचं कार्य सुधारतं. यामुळे मानसिक ताणतणाव कमी व्हायला मदत होते. काळ्या मिरीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे मेंदूच्या पेशींचं नुकसान होऊ देत नाहीत. त्यामुळे काळी मिरी मेंदूच्या आरोग्यासाठी प्रचंड फायद्याची आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2024 6:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of Black pepper: सर्दी खोकल्यापासून ते मेंदूच्या आजारांवर गुणकारी आहेत ‘हे’ काळे दाणे, स्वयंपाकघरातला ‘हा’ मसाला ठरू शकतो औषधांना उत्तम पर्याय