स्वस्तात करा खरेदी, ब्लाऊज पॅच आणि लटकन फक्त 50 रुपयांपासून, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

Last Updated:

सध्या लग्नसराईचा काळ जोरदार सुरू असल्यामुळे लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंच्या किमती महागल्या आहेत. परंतु दादरमध्ये असे एक ठिकाण आहे जिथे फक्त 50 रुपयांपासून तुम्हाला 100 हून अधिक प्रकारचे ब्लाऊज पॅच आणि लटकन मिळणार आहेत.

+
News18

News18

साक्षी पाटील, प्रतिनिधी 
मुंबई : लग्नाचा काळ म्हटला की महागाई आलीच. पण या महागाईमध्ये सुद्धा अनेक जण स्वस्त सामान कुठे मिळेल याकडे लक्ष ठेवून असतात. सध्या लग्नसराईचा काळ जोरदार सुरू असल्यामुळे लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंच्या किमती महागल्या आहेत. परंतु दादरमध्ये असे एक ठिकाण आहे जिथे फक्त 50 रुपयांपासून तुम्हाला 100 हून अधिक प्रकारचे ब्लाऊज पॅच आणि लटकन मिळणार आहेत. या सगळ्या पॅचमुळे ब्लाऊज अधिक सुंदर व्हायला मदत तर होतेच पण आपण इतरांपेक्षा वेगळे आणि सुंदर सुद्धा दिसतो. सध्या लग्नसराईच्या काळामध्ये जे जे ट्रेंडिंग ब्लाऊज पॅच आहेत किंवा लटकन आहेत इथे तुम्हाला ते सगळे प्रकार आवर्जून मिळतील.
advertisement
दादर स्थानकापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या वैष्णवी कलेक्शनमध्ये तुम्हाला हे सगळे ब्लाऊजचे सामान मिळेल. ज्यामध्ये अगदी सोनेरी, पांढरा, लाल, पिवळा, निळा अशा सगळ्या रंगांमध्ये हे मोत्यांचे लटकन उपलब्ध आहेत. ब्लाऊजच्या बॅकला लावण्यासाठीच्या सुंदर डिझाईन तर खूप आहेत. सुंदर घागऱ्याचे लटकन सुद्धा तुम्हाला अगदी 350 पर्यंत मिळून जातील. ब्लाऊज पासून ते अगदी घागऱ्याच्या स्कर्टला लावणारे ट्रेंडिंग सुंदर लटकन अगदी 50 रुपयांपासून इथे उपलब्ध आहेत.
advertisement
अनेक मुली लग्नात त्यांच्या रिसेप्शनच्या वेळेला जो लाल कलरचा घागरा घालणे प्राधान्य देतात त्याच्या ब्लाऊजला असणाऱ्या लटकन सुद्धा इथे खूप व्हरायटी उपलब्ध आहे. ज्यामध्ये सौभाग्यवती भव, दूल्हे की दुल्हनिया असे शब्द लिहिलेले आहेत. लेसमध्ये सुद्धा इथे 100 हून अधिक प्रकार तुम्हाला मिळतील. यांची किंमतही फक्त 100 रुपयांपासून सुरू होते. यात तुम्हाला अगदी काठापदराच्या लेसपासून डिझाईन एबल ट्रेंडिंग लेसपर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत.
advertisement
सुंदर रखुमाई आणि विठ्ठलाचे ब्लाऊज पॅच सुद्धा इथे उपलब्ध आहेत. त्यासोबतच जय मल्हार, सौभाग्यवती, कारभारीन असे सुंदर पॅच सुद्धा इथे मिळतील. ज्यांची किंमत साधारण 200 ते 500 पर्यंत आहे.
'माझ्याकडे लटकन, लेस आणि पॅच या सगळ्या गोष्टी होलसेल आणि रिटेल दोन्ही भावात मिळतात. अनेक जणी माझ्याकडे साडी घेऊन येतात आणि त्याला मॅचिंग असे पॅच किंवा लटकन मागतात. तुम्हाला हव्या असणाऱ्या कोणत्याही रंगाच्या पॅच किंवा लटकन माझ्याकडे हमखास मिळतात' असे वैष्णवी कलेक्शन याच्या दुकानदाराने सांगितले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
स्वस्तात करा खरेदी, ब्लाऊज पॅच आणि लटकन फक्त 50 रुपयांपासून, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement