फक्त 3 मिनिटांत जोडलं जाईल मोडलेलं हाड; आता प्लेट-रॉडची गरज नाही, वैज्ञानिकांनी तयार केला ‘बोन ग्लू’

Last Updated:

या समस्येवर जलद उपाय आता सापडला आहे. संशोधकांनी असा एक बोन ग्लू तयार केला आहे जो फक्त 3 मिनिटांत हाडं जोडू शकतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : कधी लहान मुलांचं खेळताना हाताचं किंवा पायाचं हाड सटकणं हे सामान्य झालं आहे. तर मोठ्या माणसांसोबत देखील अनेकदा असे काही प्रकार घडतात. हाड मोडणे ही शरीरासाठी मोठी समस्या असते. एकदा हाड मोडलं की ते पुन्हा नीट जोडण्यासाठी अनेक महिने लागतात. त्यात प्लास्टर, औषधं, काही वेळा सर्जरी या सगळ्या प्रक्रिया पार कराव्या लागतात. जर फ्रॅक्चर गंभीर असेल तर डॉक्टरांना प्लेट, रॉड आणि स्क्रू बसवावे लागतात. ही सर्जरीही काही तास चालते आणि हाडं पूर्ण बरी व्हायला खूप वेळ लागतो. विशेषतः वय वाढल्यानंतर हाडं कमकुवत होतात आणि छोट्या धक्क्यातही ती मोडण्याचा धोका जास्त असतो.
मात्र आता या समस्येवर जलद उपाय आता सापडला आहे. चीनमधील संशोधकांनी असा एक बोन ग्लू तयार केला आहे जो फक्त 3 मिनिटांत हाडं जोडू शकतो.
ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार, चीनच्या झेजियांग प्रांतातील वैज्ञानिकांनी Bone 02 नावाचं खास गम तयार केलं आहे. ट्रायलमध्ये दिसलं की हा गम हाडं फक्त तीन मिनिटांत जोडतं. एवढंच नाही, तर ब्लड-रिच वातावरणातसुद्धा हा गम प्रभावी ठरतं.
advertisement
संशोधन पथकाचे प्रमुख आणि झेजियांग युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेले ऑर्थोपेडिक सर्जन लिन झियानफेंग यांनी सांगितलं की, या गममुळे आता पारंपरिक प्लेट-रॉड सर्जरीची गरज कमी होणार आहे.
सुरक्षित आणि प्रभावी
या गमचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते हाडं सहज जोडू शकतात. त्यामुळे एकदा हाडं जोडली गेली की, नंतर प्लेट-पेंच काढण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया करावी लागत नाही.
advertisement
लॅब टेस्टमध्ये दिसलं की, या गममुळे हाडं जोडताना 400 पाउंडपर्यंत ताकद, 0.5 MPa शीयर स्ट्रेंथ आणि 10 MPa कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ निर्माण होते. यामुळे पारंपरिक उपचारांमुळे शरीरावर होणारे साइड इफेक्ट्स टाळता येऊ शकतात.
ऑयस्टरकडून प्रेरणा
या गमच्या शोधामागे एक वेगळी प्रेरणाही आहे. ऑयस्टर किंवा शिंपले पाण्याखाली दगड किंवा ब्रिजला घट्ट चिकटून राहतात, त्याच पद्धतीनं हे गम शरीरातल्या ओलसर वातावरणातसुद्धा प्रभावी ठरू शकेल असा विचार लिन यांना आला. त्यावर संशोधन करत त्यांनी हे गम विकसित केलं. हा शोध भविष्यात फ्रॅक्चरच्या उपचारात क्रांतिकारी ठरू शकतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फक्त 3 मिनिटांत जोडलं जाईल मोडलेलं हाड; आता प्लेट-रॉडची गरज नाही, वैज्ञानिकांनी तयार केला ‘बोन ग्लू’
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement