कोणतीही औषधं न घेता BP नियंत्रणात येणार, ब्रेन स्ट्रोकचा धोकाही टळणार? कसं? जाणून घ्या

Last Updated:

उच्च रक्तदाबाची पातळी दीर्घ काळ राहिल्यानं हृदय, मेंदू, किडनी आणि डोळे यांचं नुकसान होऊ शकते. ब्रेन स्ट्रोकचाही धोका वाढतो.

योग्य आहाराचं सेवन न करणं, बिघडलेली जीवनशैली यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सुरू होते.
योग्य आहाराचं सेवन न करणं, बिघडलेली जीवनशैली यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सुरू होते.
सध्याच्या काळात जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल झाला आहे. धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच हाय ब्लड प्रेशर अर्थात उच्च रक्तदाबाची समस्या वाढत आहे. योग्य व सकस आहाराच्या मदतीने या आजाराला स्वतःपासून दूर ठेवणं शक्य आहे. ‘जनसत्ता’ने याबाबतचं वृत्त दिलंय.
योग्य आहाराचं सेवन न करणं, बिघडलेली जीवनशैली यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सुरू होते. याशिवाय लठ्ठपणा, टाइप-2 मधुमेह, किडनीची समस्या, झोपेची समस्या यामुळेही हा आजार वाढू शकतो. या आजाराला ‘सायलेंट किलर’असंही म्हणतात. ब्लड प्रेशर पातळी 80/120 mm/hg असेल तर ती सामान्य मानली जाते; मात्र 90/140 mm/hg पेक्षा जास्त असेल तर तो उच्च रक्तदाब मानला जातो.
advertisement
ब्लड प्रेशर जेव्हा सामान्य पातळीपेक्षा जास्त होतं, त्या वेळी शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसतात. यामध्ये डोकेदुखी, अंधूक दृष्टी, चक्कर येणं, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणं अशा लक्षणांचा समावेश आहे. उच्च रक्तदाबाची पातळी दीर्घ काळ राहिल्यानं हृदय, मेंदू, किडनी आणि डोळे यांचं नुकसान होऊ शकते. ब्रेन स्ट्रोकचाही धोका वाढतो.
advertisement
शरीरातलं पोटॅशियमचं प्रमाण महत्त्वाचं
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी शरीरातल्या पोटॅशियम या खनिजाचं प्रमाण महत्त्वाचं आहे. डब्ल्यूएचओच्या मते, आहारात पोटॅशियमचं प्रमाण वाढवून उच्च रक्तदाबाची समस्या लक्षणीयरित्या कमी करता येते. कोणते पोटॅशियमयुक्त पदार्थ उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतात, ते जाणून घेऊ.
नारळ पाणी
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं. नारळ पाणी हा इलेक्ट्रोलाइट्सचा नैसर्गिक स्रोत आहे. रक्तदाब सामान्य ठेवण्यास ते उपयुक्त ठरतं. नारळ पाणी प्यायल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. वजन नियंत्रणात राहतं.
advertisement
डाळिंब
डाळिंब हे एक आरोग्यदायी फळ आहे. यामध्ये पोटॅशियम, प्रोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असतं. डाळिंब खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. रक्तदाब सामान्य राहतो. डाळिंबाचं सेवन केल्यानं वजनही नियंत्रणात राहतं.
हिरव्या भाज्या
हार्वर्ड हेल्थ स्टडीनुसार ब्रोकोली, पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या भाज्या खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. पोटॅशियम समृद्ध खाद्यपदार्थांमध्ये कॅलरीज आणि कर्बोदकं कमी असतात. या भाज्या खाल्ल्याने रक्तदाब सामान्य राहतो.
advertisement
केळी
केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. वजन कमी करण्यासाठीही हे फळ खूप प्रभावी ठरतं.
हे लक्षात ठेवा
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, उच्च रक्तदाब नियंत्रित करायचा असेल, तर धूम्रपानापासून दूर राहा. शरीर सक्रिय ठेवा. मिठाचं सेवन कमी करा. शरीर निरोगी ठेवा. तणावापासून दूर राहा. पुरेशी झोप घ्या. पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
advertisement
आजकाल धावपळीमुळे योग्य व सकस आहार घेण्याकडे दुर्लक्ष होतं. परंतु ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कोणतीही औषधं न घेता BP नियंत्रणात येणार, ब्रेन स्ट्रोकचा धोकाही टळणार? कसं? जाणून घ्या
Next Article
advertisement
Thackeray Alliance NCP Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट
  • BMC निवडणुकीत मोठा ट्वीस्ट, 'या' चार जागांनी अडवली ठाकरे-पवार आघाडीची वाट

  • महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युतीवर शिक्कामोर्तब केले असून दुसरीकडे राष्ट्र

  • ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीतला पेच कुठं अडलाय याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement