Cancer Treatment : 'या' मसाल्यांनी होणार कॅन्सरवर उपचार, भारतात झालेल्या संशोधनाला मोठं यश!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
भारतीय मसाले या आजारावर उपचार ठरू शकतात, या उद्देशाने एक संशोधन केले गेले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास येथील संशोधकांनी कर्करोगावर उपचार करण्यासाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट मिळवले आहे.
मुंबई : कर्करोग जगात सर्वत्रच खूप वेगाने वाढतो आहे. अनेक लोक याला बळी पडत आहेत. अशात भारतीय मसाले या आजारावर उपचार ठरू शकतात, या उद्देशाने एक संशोधन केले गेले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रास येथील संशोधकांनी कर्करोगावर उपचार करण्यासाठी भारतीय मसाल्यांच्या वापराचे पेटंट मिळवले आहे आणि 2028 पर्यंत ही औषधे बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारतीय मसाला वापरून बनवलेल्या नॅनोमेडिसिन्सने फुफ्फुस, स्तन, कोलन, ग्रीवा, तोंडी आणि थायरॉईड पेशींच्या विरूद्ध कर्करोगविरोधी ऍक्टिव्हिटी दर्शविल्या असल्याचे संशोधकांनी सांगितले. नॅनोमेडिसिन्स देखील सामान्य पेशींमध्ये सुरक्षित असल्याचे आढळले. सध्याच्या कर्करोगाच्या औषधांमधील प्रमुख आव्हाने असलेल्या 'सुरक्षा आणि किंमत' या समस्यांवर संशोधक सध्या काम करत आहेत.
नुकतेच प्राण्यांच्या अभ्यासाचे यशस्वी निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यानुसार 2027-28 पर्यंत औषधे बाजारात उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवून क्लिनिकल चाचण्यांचे नियोजन केले जात आहे. आयआयटी-मद्रासमधील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आर नागराजन यांनी पीटीआयला सांगितले की, "भारतीय मसाल्याच्या तेलांचे वैद्यकीय फायदे सर्वश्रुत असताना, त्यांच्या जैवउपलब्धतेमुळे त्यांचा वापर मर्यादित झाला आहे. नॅनो-इमल्शन म्हणून फॉर्म्युलेशन प्रभावीपणे या मर्यादांवर मात करते. नॅनो-इमल्शनची स्थिरता हा एक महत्त्वाचा विचार होता आणि तो आमच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्षात आणला गेला.”
advertisement
भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पारंपरिक कर्करोग उपचार थेरपीपेक्षा नॅनो-ऑन्कॉलॉजीचे फायदे जास्त आहेत. याचे कोणतेही विषारी परिणाम शरीरावर होत नाहीत. भारतीय मसाल्याच्या तेलांची मुबलकता यामुळे यांची निर्मिती सुलभ आहे. त्याचबरोबर यासाठी खर्चदेखील कमी आहे. यामुळे रुग्णांना निश्चितच फायदा होऊ शकतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 26, 2024 3:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer Treatment : 'या' मसाल्यांनी होणार कॅन्सरवर उपचार, भारतात झालेल्या संशोधनाला मोठं यश!








