advertisement

Cleaning Tips : पाणी गरम करणाऱ्या रॉडवर पांढरा थर जमलाय? या 3 पद्धती वापरा, 5 मिनिटात दिसेल नव्यासारखा

Last Updated:

बहुतांशी लोक पाणी गरम करण्यासाठी वॉटर हीटर रॉड वापरतात. मात्र, अनेक दिवस ते वापरल्यानंतर हे रॉड घाण होतात आणि त्यावर क्षाराचा पंधरा थर साचु लागतो. या थरामुळे पाणी गरम करायला खूप वेळ लागतो आणि विजेचा वापरही जास्त होतो.

News18
News18
मुंबई : हिवाळ्याच्या काळात सर्वांनाच अंघोळीसाठी गरम पाणी लागते, त्यामुळे बहुतांशी लोक पाणी गरम करण्यासाठी वॉटर हीटर रॉड वापरतात. मात्र, अनेक दिवस ते वापरल्यानंतर हे रॉड घाण होतात आणि त्यावर क्षाराचा पंधरा थर साचु लागतो. या थरामुळे पाणी गरम करायला खूप वेळ लागतो आणि विजेचा वापरही जास्त होतो. त्यामुळे नाहक मनस्ताप होतो. मात्र काही सोप्या पद्धतींनी तुम्ही काही मिनिटांत हा रॉड स्वच्छ करू शकता.
वॉटर हीटिंग रॉड साफ करणे खूप सोपे आहे. अशा परिस्थितीत, काही घरगुती उपायांच्या मदतीने आपण रॉडवरील घाण आणि हा पांढरा थर सहज काढू शकता. त्यामुळे तुमचा रॉड नवीनसारखा चमकेल. चला तर मग जाणून घेऊया फक्त 5 मिनिटात वॉटर हीटर रॉड साफ करण्याच्या टिप्स.
लिंबू आणि मीठ वापरा : रॉड स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मीठ वापरू शकता. त्यात चुना टाकून तुम्ही ते अधिक प्रभावी करू शकता. चुना आणि मीठ यांची पेस्ट बनवा. आता ती दांड्यावर लावा आणि 4-5 मिनिटांनंतर त्यावर अर्धा लिंबू चोळा. यामुळे तुमचा रॉड त्वरित चमकेल.
advertisement
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरा : बेकिंग सोडा सर्वोत्तम क्लिंजिंग एजंट मानला जातो. त्यामुळे रॉड साफ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरू शकता. यासाठी 1 बादली पाणी घ्या, नंतर त्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घाला आणि या बादलीमध्ये रॉड टाका. 4-5 मिनिटांनंतर ब्रशने रॉड घासून घ्या. तुम्हाला दिसेल की वॉटर हीटिंग रॉड नव्यासारखा चमकेल.
advertisement
हायड्रोजन पेरोक्साईडचा वापर करा : तुम्ही हायड्रोजन पेरोक्साईडने वॉटर हीटिंग रॉड सहज स्वच्छ करू शकता. यासाठी 2 चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड पाण्यात मिसळा. आता गॅसवर पाणी हलके गरम करा. नंतर या पाण्यात रॉड टाका. सुमारे 5 मिनिटांनंतर रॉड बाहेर काढा आणि ब्रशने घासून घ्या. त्यामुळे रॉडवरील घाण ताबडतोब दूर होईल आणि रॉड नवीन दिसू लागेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cleaning Tips : पाणी गरम करणाऱ्या रॉडवर पांढरा थर जमलाय? या 3 पद्धती वापरा, 5 मिनिटात दिसेल नव्यासारखा
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement