अस्सल कॉटन व्हाईट साडी, खरेदी करा 600 रुपयांपासून, वेगवेगळे प्रकार एकाच ठिकाणी! Video

Last Updated:

ध्वजारोहण करण्यासाठी अनेक जण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात. अमरावतीमधील महिलांना प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर जर कॉटनमधून पांढरी साडी खरेदी करायची असेल तर गांधी चौक येथे तुम्ही खरेदी करू शकता.

+
News18

News18

प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रजासत्ताक दिन येत्या 15 दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यादिवशी ध्वजारोहण करण्यासाठी अनेक जण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात. अमरावतीमधील महिलांना प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर जर कॉटनमधून पांढरी साडी खरेदी करायची असेल तर गांधी चौक येथे तुम्ही खरेदी करू शकता. गांधी चौक येथील मानधना या दुकानामध्ये 600 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत सुंदर अशा कॉटन साडी तुम्हाला खरेदी करता येईल.
advertisement
अमरावतीमधील मानधना साडी सेंटरचे मालक निलेश मानधन हे लोकल 18 शी बोलताना सांगतात की, आमच्याकडे नेहमीच नवनवीन साडी विक्रीसाठी येतात. संक्रांतीसाठी, दिवाळीसाठी म्हणजेच वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक सणाला आमच्याकडे विशेष स्टॉक येतोच. सद्या प्रजासत्ताक दिना जवळ आहे, त्यामुळे पांढऱ्या साडी आलेल्या आहेत. त्यामध्ये आमच्याकडे 600 रुपयांपासून ते 2 हजार रुपयांपर्यंत साडी उपलब्ध आहे. त्यापेक्षा सुद्धा भारी पॅटर्न हवे असतील ते सुद्धा आमच्याकडे 5 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
advertisement
अमरावतीमधील गांधी चौक परिसरात मानधना आमचे साडीचे दुकान आहे. अंबादेवी मंदिराच्या थेट समोरच आमचे दुकान आहे. पांढऱ्या साडीमध्ये तुम्हाला कलकत्ता कॉटन, बांगलादेश कॉटन आणि इतरही अनेक प्रकारच्या कॉटन साडी आमच्याकडे उपलब्ध आहेत. कॉटन सोबतच तुम्हाला लागेल त्यासाठी आमच्याकडे मिळतील.
advertisement
कॉटन पांढरी साडीमध्येच वेगवेगळ्या कलरच्या बॉर्डर असलेल्या साडी सुद्धा आहेत. त्याचबरोबर प्रिंटेड, प्लेन, सेमी प्रिंटेड या सर्व साडी पांढऱ्या कलरमध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत. अतिशय आकर्षक असलेली ब्लॅक कलरची प्रिंट असलेली पांढरी साडी सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर एकसारख्या साडी लागतं असेल तर ऑर्डर सुद्धा आम्ही घेतो, असे निलेश यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अस्सल कॉटन व्हाईट साडी, खरेदी करा 600 रुपयांपासून, वेगवेगळे प्रकार एकाच ठिकाणी! Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement