स्टायलिश वन पीस, खरेदी करा फक्त 220 रुपयांपासून, वांद्रेतील स्वस्त मस्त मार्केटमध्ये, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
सध्या तरुणींमध्ये शॉर्ट वन पीस घालायचा ट्रेंड वाढत चालला आहे. इथे तुम्हाला फक्त 220 रुपयांपासून एकापेक्षा एक हटके स्टाईलचे बजेट फ्रेंडली कपडे सहज मिळून जातील.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : सध्या तरुणींमध्ये शॉर्ट वन पीस घालायचा ट्रेंड वाढत चालला आहे. तुम्हाला जर पार्टीसाठी किंवा कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे स्टायलिश आणि आकर्षक असे वन पीस, गाऊन किंवा कॉर्ड सेट हवे आहेत? पण तुमचं बजेट फार कमी आहे? तर वांद्रेच्या श्री नारायण कलेक्शन या दुकानाला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला फक्त 220 रुपयांपासून एकापेक्षा एक हटके स्टाईलचे बजेट फ्रेंडली कपडे सहज मिळून जातील.
advertisement
वांद्रे रेल्वे स्थानकाला पूर्वेकडे आल्यावर स्थानक परिसरात तुम्हाला कपड्यांचे भले मोठे मार्केट दिसते. कित्येक दुकानदार आणि विक्रेते या मार्केटमधून कपड्यांची खरेदी करत असतात. आणि तो माल दुकानात अधिक दाराने विकतात. इथे सर्व दुकानदार तुम्हाला होलसेल च्या दरात कपडे विकताना दिसतील. वन पीस असेल गाऊन असेल किंवा एखादा आकर्षक कॉर्ड सेट असेल तुम्हाला किमान पाच ते सहा एका बंडलमध्ये जेवढे पिसेस आहे तेवढे पिसेस घेणे आवश्यक आहे. इथे विकली जाणारी प्रत्येक वस्तू ही होलसेलच्या दरात विकली जाते. कोणताही सिंगल पीस म्हणजे कोणतीही फक्त एक वन पीस किंवा फक्त एक गाऊन तुम्ही इथे विकत घेऊ शकत नाही.
advertisement
सध्याच्या घडीला 3-4 रंगाची प्रिंट जास्त ट्रेडिंग आहे. त्याच ट्रेडिंग पद्धतीचे बेसिक वनपीस तुम्हाला 220 रुपयांपासून मिळून जातील. तसेच मिक्स प्रिंटेड वन पिस 280 रुपयांना विकत मिळेल. चांगल्या क्वालिटीचे गाऊन तुम्हाला इथे 500 रुपयांपासून मिळून जातील. त्यात तुम्हाला 4 ते 5 प्रकार विकत मिळतील. त्यात जर बेसिक क्वालिटीचे गाऊन तुम्हाला 360 रुपयांमध्ये मिळून जातील. सेम रंगाच्या कॉर्ड सेटचा ट्रेंड गेले अनेक वर्ष सुरू आहे. यात तुम्हाला डेली वेअरसाठी फुल हाताचा कॉर्ड सेट हवा असेल तो फक्त इथे तुम्हाला 500 रुपयांमध्ये मिळून जाईल. तसेच पिकनिक साठी वेस्टर्न स्टाईलचा स्लीव्हलेस कॉर्ड सेट इथे तुम्हाला 450 रुपयांमध्ये मिळून जाईल. याच्यात देखील तुम्हाला रंगांचे वेगवेगळे ऑप्शन दिले जातील.
advertisement
तसेच सध्याच्या घडीला वन पीस सोबतच वन पीसच्या कपड्याची मॅचिंग पर्स देखील ट्रेडिंग आहे अशा प्रकारचा वन पीस आणि पर्सचा सेट तुम्हाला फक्त 360 ते 380 रुपयांमध्ये या दुकानांमध्ये मिळून जाईल. वेस्टर्न स्टाईलचे आकर्षक कपडे खरेदी करण्यासाठी वांद्रे च्या श्री नारायण कलेक्शन या दुकानाला नक्की भेट द्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 08, 2025 5:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
स्टायलिश वन पीस, खरेदी करा फक्त 220 रुपयांपासून, वांद्रेतील स्वस्त मस्त मार्केटमध्ये, Video

