कॅनव्हास आणि टोट बॅग होलसेल दरात, 30 रुपयांपसून करा खरेदी, मुंबईत एवढ्या स्वस्तात कुठंच नाहीत!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
सध्या तरुणाई सॅक बॅगपेक्षा हॅन्ड बॅगना अधिक महत्त्व देताना दिसत आहे. अशातच मुंबईत एका ठिकाणी होलसेल भावात नवीन प्रकारचे, टोट बॅग, कॅनव्हास बॅग मिळत आहेत.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : सध्या तरुणाई सॅक बॅगपेक्षा हॅन्ड बॅगना अधिक महत्त्व देताना दिसत आहे. अशातच मुंबईत एका ठिकाणी होलसेल भावात नवीन प्रकारचे, टोट बॅग, कॅनव्हास बॅग मिळत आहेत. यांची किंमत जर तुम्ही होलसेल भावात या बॅग खरेदी केल्यास तर 30 रुपये असून इथे 100 हून अधिक व्हरायटीमध्ये बॅग्ज उपलब्ध आहेत.
advertisement
मुंबईतील या होलसेल शॉपमधून अनेक उपनगरांतील व्यवसायिक बॅग खरेदीसाठी येतात. इथे विशेष म्हणजे लग्नसराईत रिटर्न गिफ्ट देण्यासाठी सुद्धा नवरा-नवरीचे सुंदर डिझाईन असणारे बॅग आहेत. या बॅग्जना स्पेशली रिटर्न गिफ्ट देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. भायखळ्यातील ट्रॉपिकल फॉरेस्टचे वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला खूप व्हरायटीमध्ये बॅग्ज मिळतील.
advertisement
इथे जर 12 किंवा 24 अशा पद्धतीने तुम्ही बॅग खरेदी केल्यात तरच तुम्हाला होलसेल दर लागू होईल. अगदी मोबाईल कव्हरच्या फोन बॅगपासून ते जूट बॅगपर्यंत इथे सगळ्या प्रकारच्या बॅग अव्हेलेबल आहेत. कॉलेजच्या मुलांसाठी तर टोट बॅगचा इथे खजिनाच आहे. यामध्ये व्हाईट कलरमध्ये टोट बॅग मिळतील. ज्यामध्ये वेगवेगळे डिझाईन उपलब्ध आहेत.
advertisement
मुलांसाठी सुद्धा प्रॉपर कापडाच्या शिवलेल्या बॅग इथे मिळतील. यांची किंमतही फक्त 350 रुपयांपासून सुरू होते. त्यासोबत वन साईड बॅग इथे फक्त 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत. ठाणे, मुंबई त्यासोबत नवी मुंबईतून सुद्धा अनेक व्यवसायिक इथे होलसेल रेटमधून बॅग खरेदी करण्यासाठी येतात. इथे रंगांचा सुद्धा खूप ऑप्शन असल्यामुळे तुम्हाला हव्या त्या प्रकारचे आणि हव्या त्या रंगांचे बॅग तुम्ही खरेदी करू शकता.
advertisement
भायखळा स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर असणारे भायखळा पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच ट्रॉपिकल फॉरेस्ट हे होलसेल बॅग हाऊस आहे.
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 08, 2025 2:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
कॅनव्हास आणि टोट बॅग होलसेल दरात, 30 रुपयांपसून करा खरेदी, मुंबईत एवढ्या स्वस्तात कुठंच नाहीत!

